राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सकाळी (16 फेब्रुवारी, 2025) राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नवीन स्वरूपातील चेंज ऑफ गार्ड सोहळ्याच्या उद्घाटनाला उपस्थित राहिल्या.
हा समारंभ पुढील शनिवारपासून म्हणजेच 22 फेब्रुवारी 2025, पासून मोठ्या संख्येने येणाऱ्या पाहुण्यांसाठी खुला असेल, ज्यात दर्शकांना राष्ट्रपती भवनाच्या पार्श्वभूमीवर नयनरम्य देखावे आणि सांगीतिक अदाकारी अनुभवायला मिळू शकणार आहे. राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांच्या तुकड्या आणि अश्वदल तसेच सेरेमोनियल गार्ड बटालियनच्या तुकड्या, प्रासंगिक लष्करी ब्रास बँडसह विस्तीर्ण क्षेत्रावर सादर होणाऱ्या लष्करी कवायती यांचा या नवीन स्वरूपात समावेश असेल.
अभ्यागत https://visit.rashtrapatibhavan.gov.in/ वर त्यांच्या जागा आरक्षित करू शकतात.
Matribhumi Samachar Marathi

