नवी दिल्ली रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी आशा मोदींनी व्यक्त केली आहे.
एका X पोस्टच्या माध्यमातून पंतप्रधानांनी म्हटले आहे की;
“नवी दिल्ली रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे आपण व्यथित झालो आहोत. ज्यांना आपल्या प्रियजनांना गमवावे लागले त्या सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो. या चेंगराचेंगरीमुळे हानी पोहोचलेल्या सर्वांना प्रशासन मदत करत आहे.”
Matribhumi Samachar Marathi

