Thursday, January 08 2026 | 09:46:45 AM
Breaking News

मत्स्य-6000: भारताच्या चौथ्या जनरेशनमधील गहन समुद्रात काम करू शकणाऱ्या पाणबुडीने पाण्यामधली चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली

Connect us on:

नवी दिल्ली 17 फेब्रुवारी 2025. भारत सरकारच्या खोल महासागरी उपक्रमांतर्गत  केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाने समुद्रयान प्रकल्पाचा भाग म्हणून “मत्स्य-6000” या चौथ्या पिढीतील खोल -सागरात काम करणाऱ्या मानवी वैज्ञानिक पाणबुडीची संरचना आणि विकसनाचे महत्त्वाकांक्षी कार्य करण्याची जबाबदारी राष्ट्रीय सागरी तंत्रज्ञान संस्थेकडे सोपवली आहे. भारताच्या महासागरी अन्वेषण क्षमतांच्या संदर्भात महत्त्वाचा टप्पा गाठत या अत्याधुनिक पाणबुडीची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की 2.1 मीटरचा आटोपशीर व्यास असलेल्या या गोलाकार पाणबुडीमध्ये तीन व्यक्ती सामावू शकतील. संरचनेचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मत्स्य-6000 च्या कार्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या इतर उपयंत्रणा निश्चित करून विकसित करण्यात आल्या.

या पाणबुडीच्या अनोख्या बांधणीच्या कक्षेत सर्व यंत्रणांचे सुरळीत एकत्रीकरण सुनिश्चित करण्यासाठी मत्स्य पाणबुडीचे 500 मीटरच्या परिचालन कक्षेत एकात्मिक ड्राय टेस्ट्स च्या व्यापक शृंखलेद्वारे परीक्षण करण्यात आले. या चाचण्यांमध्ये यशस्वी झाल्यानंतर वेट टेस्ट्स करण्यासाठी तसेच या पाणबुडीच्या कार्यक्षमतेचे प्रात्यक्षिक करून बघण्यासाठी 27 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2025 या काळात मस्त्य पाणबुडीला चेन्नईजवळच्या एल अँड टी जहाजबांधणी सुविधेतील कट्टुपल्ली बंदरात नेण्यात आले.
येथे विविध महत्त्वपूर्ण मापदंडाच्या संदर्भात मस्त्य पाणबुडीच्या कामगिरीचे अत्यंत दक्षतेने मूल्यमापन करण्यासाठी विविध चाचण्या करण्यात आल्या. मर्यादित प्रमाणातील मुक्त वातावरणात या पाणबुडीतील शक्ती आणि नियंत्रण नेटवर्क यांची मजबूती, या वाहनाची तरंगण्याची क्षमता आणि स्थिरता, मानवी पाठबळ आणि सुरक्षा यंत्रणा तसेच कौशल्य आणि विशेष करून पुढे आणि मागे हालचाल करण्याची क्षमता यांच्यावर आधारित मूल्यमापन करण्यात आले. त्याबरोबरच, दिशादर्शन आणि संपर्कविषयक क्षमतांचे देखील परीक्षण करण्यात आले. विविध अत्याधुनिक समुद्रशास्त्रीय संवेदकांचा समावेश असलेले वैज्ञानिक पेलोड देखील बारकाईने तपासण्यात आले. तसेच त्यांची अभिप्रेत कार्यक्षमता निश्चित करण्यासाठी त्यांचे प्रात्यक्षिक देखील घेण्यात आले.

मानव सहित तसेच मानव विरहित अशा दोन्ही पद्धतीची प्रात्याक्षिके यावेळी घेण्यात आली. मानवसहित प्रात्यक्षिकांच्या वेळी कसून चाचणी घेत जीवनरक्षक प्रणालीची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यात आली. बंदरात पाण्याच्या खोलीवर असलेल्या निर्बंधांमुळे, पाण्याखालील आवाजी संपर्क यंत्रणा काहीशी कमी परिणामकारक होती. त्यामुळे उथळ पाण्यातील परिचालनातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी अधिक तपासणीची आवश्यकता अधोरेखित झाली. पाणबुडीच्या कार्यक्षेत्रातील काही घटकांची कामगिरी आणि पूर्णत्व अधिक सुधारण्यासाठी अतिरिक्त प्रयत्नांची गरज असल्याचे दिसून आले. असे असले तरीही बंदरावर झालेल्या मत्स्य 6000 च्या यशस्वी वेट टेस्ट्समुळे वर्ष 2025 च्या अखेरीपर्यंत 500 मीटर खोलीवर जाऊन प्रात्याक्षिके करण्याचा संबंधितांचा आत्मविश्वास वाढला आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

आयुष निर्यात प्रोत्साहन परिषदेने नवी दिल्ली येथे साजरा केला चौथा स्थापना दिन

भारतीय पारंपरिक औषध प्रणाली आणि आरोग्यविषयक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून …