Thursday, December 11 2025 | 04:27:32 PM
Breaking News

कोळसा मंत्रालयाने 200 कोळसा खाणींचे वाटप पूर्ण केले

Connect us on:

नवी दिल्‍ली, 17 जून 2025. भारताच्या कोळसा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याच्या अथक प्रयत्नांना अधोरेखित करत कोळसा मंत्रालयाने 200 कोळसा खाणींचे वाटप पूर्ण करून एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सिंघल बिझनेस प्रायव्हेट लिमिटेडला मारवाटोला-II कोळसा ब्लॉकसाठी वाटप आदेश जारी करण्यात आला असून क्षेत्रीय सुधारणांना अधिक गती देण्याची, खाजगी भागीदारीला प्रोत्साहन देण्याची आणि कोळसा उत्पादनात राष्ट्राला आत्मनिर्भर करण्याची कोळसा मंत्रालयाची बांधिलकी यातून दिसून येते. या यशाबरोबरच मंत्रालय अधिक लवचिक, पारदर्शक, भविष्यासाठी सज्ज, कोळसा परिसंस्था निर्माण करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.

हा ऐतिहासिक टप्पा पार करण्यात उद्योगजगतातील भागधारकांचा सातत्यपूर्ण सहभाग आणि विश्वास यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे असे सांगून नामनिर्देशित अधिकाऱ्यांनी  उद्योगातील भागधारकांचे मनापासून आभार मानले. गुंतवणुकीला पोषक वातावरण निर्मिती, प्रक्रियात्मक अडथळे कमी करणे आणि संपूर्ण देशभरात कोळसा खंडाच्या कार्यान्वयनाला वेग देण्यासाठी मंत्रालयाच्या वचनबद्धतेबद्दल देखील  आभार व्यक्त केले.

हा टप्पा, जरी संख्यात्मक स्वरूपात असला तरी, त्याचे महत्त्व खूपच खोलवर आहे.  देशांतर्गत कोळसा उत्पादनाला चालना देण्यासह आयातीवरील अवलंबित्व कमी करून दीर्घकालीन ऊर्जासुरक्षा सुनिश्चित करतानाच राष्ट्रीय ऊर्जा मॅट्रिक्सचे पुनर्संतुलन गाठण्याचा कोळसा मंत्रालयाचा दूरदर्शी दृष्टिकोन यातून दिसून येतो. या उपक्रमांच्या एकत्रित परिणामांमुळे आर्थिक वृद्धी आणि धोरणात्मक स्वायत्तता या दोन्हीला बळकटी मिळते.

About Matribhumi Samachar

Check Also

कम्युनिकेशन अकाउंट्स नियंत्रक यांनी पणजी येथे त्रैमासिक दूरसंचार संवाद कार्यक्रम केला आयोजित

पणजी, 10 डिसेंबर 2025 महाराष्ट्र आणि गोवा येथील कम्युनिकेशन अकाउंट्स नियंत्रक (सीसीए) कार्यालयाने 10 डिसेंबर …