Saturday, February 07 2026 | 03:56:15 AM
Breaking News

आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाच्या वतीने आयुर्वेदाच्या माध्यमातून बालरोग शास्त्रातील आजार व आरोग्य व्यवस्थापन या विषयावर उद्यापासून 30 वा राष्ट्रीय परिसंवाद होणार

Connect us on:

आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठामार्फत  (आर ए व्ही ) आयुर्वेदाच्या माध्यमातून  ‘बालरोग शास्त्रातील आजार व आरोग्य व्यवस्थापन’  या विषयावर आधारित 30 वा राष्ट्रीय परिसंवाद उद्या 18 व  19 ऑगस्ट 2025  रोजी नवी दिल्लीतील लोदी रोड, स्कोप कॉम्प्लेक्स सभागृहात आयोजित केला जाणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिसंवादात ख्यातनाम तज्ज्ञ, वैद्य, संशोधक व  विद्यार्थी एकत्र येऊन पारंपारिक आयुर्वेदिक दृष्टिकोन आणि बाल आरोग्य व निरोगीपणाला प्रोत्साहन देण्यासाठी समकालीन पुराव्यावर आधारित पद्धतींवर चर्चा करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी आरोग्यदायी समाज घडविण्यासाठी पारंपरिक औषधपद्धतींच्या महत्त्वावर भर दिला आहे. आयुष मंत्रालयाचे स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री व आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री  प्रतापराव  जाधव यांनी बाल आरोग्याच्या सर्वांगीण संवर्धनासाठी आयुर्वेदाला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.

परिसंवादाचे  प्रमुख वैशिष्ट्ये :

  • आयुर्वेदातील बालआरोग्य विषयक शास्त्रीय संशोधन निबंधांचे सादरीकरण.
  • तरुण तज्ज्ञ व वैद्य यांचे पोस्टर सादरीकरण.
  • बालकांमध्ये प्रतिबंधात्मक व संवर्धनात्मक आरोग्य सेवांवरील परस्परसंवादी सत्रे.
  • सहभागींसाठी स्मृतिचिन्ह व परिसंवाद संच
  • नोंदणीकृत प्रतिनिधींना क्रेडिट पॉइंट्स व सहभाग प्रमाणपत्रे

या परिसंवदात बालरोग आयुर्वेद क्षेत्रातील ज्ञानवृद्धी, नवकल्पना मांडणी आणि सहयोगी संशोधनाला चालना देण्यासाठी व्यापक प्रमाणात चर्चा होणार आहे.

या परिसंवादासाठी नोंदणी अनिवार्य असून, इच्छूकांनी : https://forms.gle/1dosxPcMsPC6zkRT7 या लिंकवर नोंदणी करावी.

About Matribhumi Samachar

Check Also

एडीएद्वारे आयोजित दोन दिवसीय ‘एअरोनॉटिक्स 2047’राष्ट्रीय चर्चासत्राला बंगळुरुमध्ये प्रारंभ

एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए) द्वारे आयोजित ‘एअरोनॉटिक्स 2047’या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला  बंगळुरूच्या सेंटर फॉर एअरबोर्न …