नागपूर, 17 डिसेंबर 2025. श्री के. संजयमूर्ती, भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांनी नागपूर येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीला भेट दिली आणि भारतीय राजस्व सेवा अधिकाऱ्यांच्या 79 व्या तुकडीचे उद्घाटन केले. 182 आईआरएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून आपल्या घटनात्मक जबाबदारी वर लक्ष केंद्रित करण्याचेआवाहनकेले. तसेच जटिल करविषय हाताळताना कायदेशीर पालनासोबत व्यापक राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. त्यांनी निरंतर शिक्षण, शैक्षणिक संस्थांशी सहकार्य आणि क्षमता विकासयावर भर दिला. संशोधन अनुदानांवरील जीएसटी तसेच नवोन्मेष आणि स्टार्ट-अप्ससाठी निधीविषयी त्यांनी उदाहरणे दिली.

5M6O.jpeg)
यानंतर सीएजी यांनी महालेखाकार (लेखाआणि हक्क्दारी)- II, नागपूर कार्यालयाला भेट दिली, जिथे श्रीमती सुहासिनी गोतमारे, आयएएएस, महालेखाकार(लेखाआणि हक्क्दारी) व लेखापरीक्षण यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी लेखापरीक्षण कार्यालय, लेखाकार्यालय आणि भारतीय लेखा आणि लेखापरीक्षण विभाग (आईएंडएड़ी) अंतर्गत प्रशिक्षण संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यांनी पेन्शन विभागांना भेट दिली आणि पेन्शन प्रकरणांच्या .डिजिटायझेशन वर भर दिला. त्यांनी महालेखाकार (लेखापरीक्षण), महालेखाकार (लेखाआणि हक्क्दारी)आणि प्रादेशिक क्षमता विकास व ज्ञानसंस्था (RCBKI) यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी RCBKI मधील प्रशिक्षण सुविधा व पायाभूत सुविधांचा आढावा घेतला. तसेच सर्व सेवा संघटनांच्या कार्यकारिणी सदस्यांशी संवाद साधला.

XAO5.jpeg)
आपल्या भेटीदरम्यान, सीएजी यांनी एनएडीटी तसेच आईएंडएड़ी कार्यालयांच्या परिसरात वृक्षारोपणही केले .
B35N.jpeg)

Matribhumi Samachar Marathi

