क्षमता बांधणी आयोगाने राष्ट्रीय कर्मयोगी व्यापक जनसेवा कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यासाठी मास्टर ट्रेनर्स( मुख्य प्रशिक्षकांचे) प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. हे प्रशिक्षण ६ ते १८ जानेवारी २०२५ दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते.
नागरी सेवांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे वर्तणुकीय प्रशिक्षण सेवाभाव – निःस्वार्थ सेवेची भावना – वाढवण्यासाठी आणि प्रशासनासाठी नागरिक-केंद्रित दृष्टिकोनाला प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. १२ दिवसांत, दिल्लीतील केंद्र सरकारच्या ८० मंत्रालये आणि विभागांमधील २१९ मास्टर ट्रेनर्सनी आठ परस्परसंवादी प्रशिक्षण तुकड्यांमध्ये भाग घेतला. हे मास्टर ट्रेनर आता त्यांच्या सहकाऱ्यांना उदा. संचालक, उपसचिव, अवर सचिव, विभाग अधिकारी, सहाय्यक विभाग अधिकारी आणि मल्टी-टास्किंग स्टाफ यांना त्यांच्या संबंधित कार्यालयांमध्ये प्रशिक्षण देतील.


प्रशिक्षणादरम्यान क्षमता बांधणी आयोगाचे अध्यक्ष आदिल जैनुलभाई आणि सदस्य (मानव संसाधन) आर. बालसुब्रमण्यम यांनी राष्ट्रीय कर्मयोगी जनसेवा कार्यक्रमासाठीचे त्यांचे विचार विद्यापीठ मांडले आणि प्रशासनाची पुनर्बांधणी तसेच निःस्वार्थ सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचे महत्त्व देखील अधोरेखित केले.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम जगदीश कुमार आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव अतुल कुमार तिवारी यासारख्या इतर प्रतिष्ठित व्यक्तींनीही सहभागींना संबोधित केले आणि उद्देश आणि समर्पणाची भावना निर्माण करणारे विचार सामायिक करून त्यांना मौलिक सूचना केल्या.
Matribhumi Samachar Marathi

