नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2025. युनायटेड किंगडमचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पत्नी अक्षता मूर्ती आणि कन्या कृष्णा व अनुष्का यांच्यासह आज संसद भवनाला भेट दिली.
लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंग यांनी ऋषी सुनक आणि त्यांच्या कुटुंबियांचे स्वागत केले. राज्यसभेचे महासचिव पी सी मोदी देखील या प्रसंगी उपस्थित होते.
आजच्या भेटीदरम्यान सुनक कुटुंबाने संसद भवन संकुलामध्ये फेरी मारली आणि त्याच्या वास्तुशास्त्रीय वैभवाची प्रशंसा केली. या संकुलातील दालने, कक्ष, संविधान सभागृह तसेच संविधान सदन अशा उल्लेखनीय जागांना त्यांनी भेट दिली.
ही भेट सुनक यांच्या नुकत्याच सुरु झालेल्या भारत दौऱ्यातील कार्यक्रमांचा भाग आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजे 15 फेब्रुवारी 2025 रोजी सुनक आणि त्यांच्या कुटुंबाने ताज महालला भेट दिली.
भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं
ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)
Matribhumi Samachar Marathi

