Saturday, March 28 2026 | 04:25:02 PM
Breaking News

आयएनएस अर्नाळा भारतीय नौदलात दाखल; विशाखापट्टणमच्या नाविक तळावर सरसेनाध्‍यक्ष जनरल अनिल चौहान यांच्या उपस्थितीत अर्नाळा चे जलावतरण

Connect us on:

नवी दिल्ली, 18 जून 2025. भारतीय नौदलाच्या पूर्व नौदल कमांडमध्ये ‘आयएनएस अर्नाळा’ या पहिल्या स्वदेशी पाणबुडीविरोधी युद्धनौकेतील शॅलो वॉटर क्राफ्ट 18 जून 2025 रोजी नौदल प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम येथील नेव्हल डॉकयार्डमध्ये दाखल झाली. पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ यांनी आयोजित केलेल्या या समारंभात वरिष्ठ नौदल अधिकारी, प्रतिष्ठित  नागरी, माजी कमांडिंग अधिकारी उपस्थित होते. आयएनएस अर्नाळा च्या समावेशामुळे भारताची संरक्षण क्षमता अधिक बळकट झाली असून, स्वदेशी डिझाइन,अभियांत्रिकी आणि उत्पादनाच्या यशाचेही हे प्रतीक आहे. स्वदेशी बनावटीच्या युद्धनौकांमध्ये आता अत्याधुनिक स्टेल्थ तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक युद्ध सुईट्स आणि प्रगत सेन्सर यासारख्या प्रणालींचा समावेश असून, यामुळे नौदलाची युद्ध सज्जता मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने भारताची वाटचाल अधिक गतिमान झाली आहे. भारतीय नौदलाच्या स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित सामरिक  दृष्टिकोन राबवण्यासाठीच्या कटिबद्धतेचे   सरसेनाध्‍यक्ष  जनरल अनिल चौहान यांनी कौतुक केले. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक अर्नाळा किल्ल्याच्या नावावरून  नौकेला आयएनएस अर्नाळा हे नाव देण्यात आले आहे. भविष्यातील संरक्षण आव्हानांचा सामना   करण्यासाठी नौदल बळकटीकरणाच्या दिशेने टाकलेले हे महत्वाचे पाऊल आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

केंद्र सरकारचा मोठा दावा: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट; महाराष्ट्राला ५ दिवसांत १४,००० कोटींची मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून, विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे …