नवी दिल्ली, 18 जून 2025. भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा, वैमानिक संरक्षण, गुणवत्ता हमी सेवा आणि केंद्रीय कामगार सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी आज (जून 18, 2025) राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या, तुम्हाला मिळालेले यश तुमच्या दृढनिश्चयाचे आणि चिकाटीचे प्रतिबिंब आहे. आपल्या निर्णयांमध्ये आणि कृतींमध्ये जीवन बदलण्याची शक्ती आहे,हे सार्वजनिक सेवेतील आव्हानांना तोंड देताना, हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे, असेही त्या पुढे म्हणाल्या.
कॉर्पोरेट क्षेत्र हे आपल्या देशाच्या आर्थिक वाढीचा आणि विकासाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे, असे भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवेच्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या.
केंद्रीय कामगार सेवेच्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या, की त्यांची भूमिका महत्त्वाची आणि बहुआयामी आहे – एकीकडे, ते कायद्याचे रक्षक आहेत, कामगारांच्या हक्कांचे आणि प्रतिष्ठेचे रक्षण करणाऱ्या कामगार कायद्यांचे पालन सुनिश्चित करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले आहे. त्यांचे काम मालकवर्ग आणि कर्मचाऱ्यांमधील गुंतागुंत सोडवून त्यांच्यामध्ये संतुलन निर्माण करू शकते, असे त्यांनी सांगितले. यामुळे परस्पर आदर, उत्पादकता आणि समानतेचे वातावरण निर्माण करण्यास मदत करू शकतात.
वैमानिक संरक्षण गुणवत्ता आश्वासन सेवेच्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाले की, लष्करी विमान वाहतूक गुणवत्ता ही केवळ तांत्रिक बाबी पूर्ण करण्याविषयापुरती मर्यादित नाही तर ती सुरक्षित कारवाई, मोहिमेची तयारी, विश्वासार्हता आणि धोरणात्मक श्रेष्ठता सुनिश्चित करण्याबद्दल आहे. खाजगी उद्योगांना संरक्षण परिसंस्थेत एकत्रित करून,सहाय्यक धोरणे आणि तंत्रज्ञान हस्तांतरण करून भारत स्वदेशीकरणाच्या प्रयत्नांना गती देऊ शकतो आणि जागतिक पातळीवर संरक्षण उत्पादक म्हणून स्वतःचे स्थान निर्माण करू शकतो.
Matribhumi Samachar Marathi

