नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र सिंग यादव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला असून या लेखामध्ये जागतिक हवामान वित्तपुरवठ्याला अधिक पारदर्शकता आणि सामायिक मानकांच्या साहाय्याने नव्याने आकार देण्यासाठी उपलब्ध संधी अधोरेखित केल्या आहेत.
या लेखात भारताचा हवामान वित्त वर्गीकरण प्रणाली मसुदा आणि देशातील वाढत्या हरित वित्तीय प्रवाहाचा उल्लेख करण्यात आला आहे, भविष्यासाठी अधिक परिणामकारक जागतिक संरचनेला मार्गदर्शन करू शकणाऱ्या व्यावहारिक नेतृत्वाच्या उदाहरणांमध्ये यांची गणना होते, असे या लेखात म्हटले आहे.
भूपेंद्र यादव यांच्या लेखाला प्रतिसाद देत पंतप्रधानांनी म्हटले आहे :
जागतिक हवामान वित्तपुरवठ्याला अधिक पारदर्शकता आणि सामायिक मानकांच्या साहाय्याने नव्याने आकार देण्यासाठी भक्कम संधी आहे, असे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी अधोरेखित केले आहे.
त्यांनी भारताचा हवामान वित्त वर्गीकरण प्रणाली मसुदा आणि देशातील वाढता हरित वित्तीय प्रवाहाला भविष्यासाठी अधिक परिणामकारक जागतिक संरचनेला मार्गदर्शन करू शकणाऱ्या व्यवहार्य नेतृत्वाचे उदाहरण म्हणून अधोरेखित केले आहे.
Matribhumi Samachar Marathi

