Wednesday, December 24 2025 | 08:28:06 PM
Breaking News

ॲक्सिस बँक आणि गुगल पे यांच्या तर्फे FLEX सादर

Connect us on:

* भारताच्या आर्थिक गरजांसाठी तयार केलेले UPI-सक्षम, डिजिटल, को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड

* Flex तर्फे गुगल पे फ्लेक्स ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड सादर – या ऑफरखाली सादर होणारे पहिले कार्ड
* RuPay नेटवर्कवर आधारित Flex क्रेडिट कार्डचा अनुभव सुलभ करते. गुगल पे ॲपमधून पूर्णपणे डिजिटल अर्ज प्रक्रिया, त्वरित रिवॉर्ड रिडेम्प्शन आणि लवचिक परतफेड पर्याय उपलब्ध करून देते

नागपूर, डिसेंबर 2025: ॲक्सिस बँक आणि गुगल यांनी आज संयुक्तपणे गुगल पे फ्लेक्स ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड सादर केले. भारताच्या आर्थिक गरजांसाठी डिझाइन करण्यात आलेले हे यूपीआय-सक्षम को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड संपूर्ण कार्ड अनुभव अधिक सोपा, सुलभ आणि उंचावणारा करते. RuPay नेटवर्कवर आधारित हे कार्ड, लोक दररोज ज्या प्रकारे UPI पेमेंट्स करतात तितकाच सर्वत्र वापरता येणारा क्रेडिट अनुभव देण्याचे उद्दिष्ट ठेवते. यामध्ये गुगल पे चा सोयीस्कर आणि सुरक्षित अनुभव तसेच ॲक्सिस बँकेचे विश्वासार्ह बँकिंग कौशल्य एकत्रित करण्यात आले आहे. गुगल पे फ्लेक्स ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड हे फ्लेक्स बाय गुगल पे अंतर्गत सादर होणारे पहिले कार्ड आहे. फ्लेक्स बाय गुगल पे ही गुगलची नवीन योजना असून सर्वांसाठी क्रेडिट अधिक सोपे आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आली आहे. यामुळे गुगलचा को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड क्षेत्रात प्रवेश झाला आहे.

फ्लेक्स बाय गुगल पे अंतर्गत, वापरकर्ते काही मिनिटांत कार्डसाठी अर्ज करू शकतात आणि कार्ड प्राप्त करू शकतात तसेच लाखो ऑफलाइन व्यापाऱ्यांकडे किंवा विविध ॲप्सवर पेमेंट करू शकतात. प्रत्येक फ्लेक्स व्यवहारावर वापरकर्त्यांना रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात आणि ते तत्काळ रिडीम करता येतात. त्यामुळे दैनंदिन खर्चाच्या वेळी ठोस फायदे मिळतात. याशिवाय, गुगल पे ॲपमधूनच लवचिक परतफेड पर्याय उपलब्ध असून, वापरकर्ते सहजपणे क्रेडिट कार्ड बिल्स EMIs मध्ये रूपांतरित करू शकतात. त्यामुळे सोय, नियंत्रण आणि आर्थिक लवचिकता सुनिश्चित होते.

ॲक्सिस बँकेच्या कार्डस, पेमेंट्स आणि वेल्थ मॅनेजमेंटच्या अध्यक्ष आणि प्रमुख अर्निका दीक्षित म्हणाल्या, “आमच्या ग्राहकांसाठी डिजिटल पेमेंट्सचा अनुभव नव्याने परिभाषित करण्यासाठी गुगलसोबत भागीदारी पुढे नेताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. UPI हा प्राधान्याचा पेमेंट मोड म्हणून उदयास येत असताना, डिजिटल-फर्स्ट ग्राहकांसाठी अनुकूल अशी क्रेडिट ऑफर निर्माण करण्याची स्पष्ट संधी आम्हाला दिसली. UPI क्षेत्रात अग्रणी असताना त्या आधारावर ॲक्सिस बँक आपल्या आर्थिक उपायांतील कौशल्याला गुगल पे च्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत जोडत असल्याने त्वरित रिवॉर्ड्स, लवचिक परतफेड पर्याय आणि अधिक सुविधांसह दैनंदिन व्यवहार सुलभ होतात. गुगल पे ॲपमध्ये विनाअडथळा अखंडपणे एकत्रित केलेले हे कार्ड सुरक्षित, सोयीस्कर आणि रिवॉर्डिंग अनुभव देते. आधुनिक भारतीय जीवनशैलीला ते पूर्णपणे पूरक आहे.”

गुगल पे प्रॉडक्ट मॅनेजमेंटचे वरिष्ठ संचालक शरत बुलुसू म्हणाले, “गुगल पे मध्ये आमचे उद्दिष्ट नेहमीच तंत्रज्ञानाच्या मदतीने आर्थिक उत्पादने सर्वांसाठी सोपी आणि सुलभ बनवणे हे राहिले आहे. भारतात डिजिटल पेमेंट्स सर्वत्र वापरात असली तरी व्यवहारात्मक क्रेडिटचा वापर अजूनही अपेक्षेइतका झालेला नाही. ही दरी भरून काढण्यासाठी आम्ही फ्लेक्स विकसित केले असून त्यामध्ये पुढील पिढीच्या वापरकर्त्यांसाठी कार्ड अनुभव सुलभ आणि नव्याने साकारण्यात आला आहे. ॲक्सिस बँकेसोबत हे प्रथम सादर करताना आम्हाला आनंद होत आहे आणि लवकरच आणखी इश्यूअर पार्टनर्स जाहीर करण्यास आम्ही उत्सुक आहोत. RuPay नेटवर्कची व्यापक स्वीकारार्हता, ॲक्सिस बँकेचे आर्थिक कौशल्य आणि गुगल पे चा विश्वासार्ह अनुभव यांचा संगम साधून, आम्ही भारतातील वापरकर्त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आत्मविश्वास आणि नियंत्रण देणारी डिजिटल उपाय सुविधा सादर करत आहोत.”

NPCI च्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ग्रोथ सोहिनी राजोला म्हणाल्या, “ग्राहकांसाठी विश्वासार्ह आणि अखंड डिजिटल पेमेंट अनुभव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गुगल पे फ्लेक्स ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड हाच दृष्टीकोन पुढे नेत असून, दैनंदिन पेमेंट्स अधिक स्मार्ट बनवते. वापरकर्ते पूर्णपणे विनाअडथळा प्रवासात अधिक सोय आणि त्वरित रिवॉर्ड्सचा लाभ घेऊ शकतात.”

गुगल पे फ्लेक्स ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड दैनंदिन खर्चाचे व्यवहार अधिक प्रभावी करण्यासाठी अनेक आकर्षक फायदे देते, त्यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे:

सोपे डिजिटल अर्ज: वापरकर्ते कुठूनही शून्य खर्चात अर्ज करू शकतात आणि कोणत्याही प्रत्यक्ष कागदपत्रांशिवाय काही मिनिटांत व्यवहार सुरू करू शकतात. कार्ड पूर्णपणे मोबाईलमध्ये उपलब्ध असल्याने गरज असताना कधीही वापरता येते.
कुठेही, सर्वत्र पेमेंट शक्य: RuPay नेटवर्कवर आधारित असल्यामुळे, वापरकर्ते लाखो ऑफलाइन व्यापाऱ्यांकडे स्कॅन करून पेमेंट करू शकतात किंवा त्यांच्या आवडत्या ॲप्सवर लहान अथवा मोठ्या रकमेचे पेमेंट करू शकतात.
त्वरित रिवॉर्ड्स: व्यवहारांवर मिळणारे स्टार्स कोणत्याही फ्लेक्स व्यवहारावर त्वरित रिडीम करता येतात. त्यामध्ये 1 स्टार = 1 रु. इतकी किंमत असते. रिवॉर्ड्स वापरण्यासाठी महिनाअखेरीपर्यंत वाट पाहावी लागत नाही.
लवचिक परतफेड नियंत्रण: खर्च आणि बिल्स थेट गुगल पे ॲपमध्ये ट्रॅक करता येतात. पूर्ण रक्कम भरण्याचा किंवा क्रेडिट कार्ड बिल EMIs मध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
इन-ॲप नियंत्रण: गुगल पे ॲपमधून वापरकर्ते सहजपणे कार्ड वापराचे व्यवस्थापन करू शकतात, कार्ड ब्लॉक/अनब्लॉक करू शकतात किंवा PIN त्वरित रीसेट करू शकतात.

गुगल आणि ॲक्सिस बँक आजपासून या सेवेचा टप्प्याटप्प्याने विस्तार सुरू करत असून येत्या काही महिन्यांत सर्व वापरकर्त्यांपर्यंत ही सेवा पोहोचवण्याची अपेक्षा आहे.

Featured Article

About Matribhumi Samachar

Check Also

आर्थिक गुंतवणूक आणि विकासाच्या प्रमुख प्रेरक घटकांपैकी सुरक्षा एक घटक आहे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नवी दिल्‍ली, 23 डिसेंबर 2025. राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी आज (23 डिसेंबर 2025) नवी दिल्ली येथे …