Wednesday, March 25 2026 | 08:27:31 PM
Breaking News

सोनेगाव खर्डा येथे संताजी महाराज जयंती उत्साहात

Connect us on:

अमरावती. सोनेगाव खर्डा येथे तेली समाजातर्फे संत श्री संताजी जगनाडे महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. समाजातील एकता टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय शेलोकार, कृष्णा बोडणे, नारायण रघुते, निलिमा वरटकर, तुकाराम वरटकर, रघुनाथ चकोले, जयश्री शेलोकार आदी लाभले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व श्री संत संताजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांना हार अर्पण करून झाली. कार्यक्रमात प्रारंभी धनंजय शेलोकर यांनी मत मांडले. तर कृष्णा बोडणे यांनी समाजकारण आणि राजकारण या दोन्हीचा मेळ साधण्याचे उपस्थितांना आव्हान केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अॅड. चैत्राली कारंजेकर बोडणे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने तेली समाज बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोपाल रघुते, योगेश सावरकर, सुमीत रघूते, भूषण शेलोकार, प्रदीप बोडणे, सूरज बोडणे, राहुल बोडणे, शुभम शेलोकार, तेजस वैद्य, हरी गभणे, लोकेश सावरकर, मंथन सावरकर, प्रविण पिसे आदींनी परिश्रम घेतले.

About Matribhumi Samachar

Check Also

कळंबी गावात मल्टीस्पेशालिटी आरोग्य शिबिराचे आयोजन, ११४ रुग्णांना मिळाला लाभ

कळंबी (ता. कळमेश्वर, जि. नागपूर), २१ मार्च, २०२६: अदानी समूहाच्या सीएसआर उपक्रमांतर्गत बुधवारी कळंबी गावातील …