राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या शूर जवानांचे धाडस, समर्पण आणि निःस्वार्थ सेवेचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
यासंदर्भात एक्स या समाज माध्यमावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेला संदेश :
राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) स्थापना दिनाच्या या खास दिनाच्या निमित्ताने आम्ही प्रतिकूल काळात ढाल बनणाऱ्या शूर जवानांचे धैर्य, समर्पण आणि नि:स्वार्थ सेवेला सलाम करतो. जीव वाचवणे, आपत्तींच्या घटनांमध्ये प्रतिसाद देणे आणि संकटाच्या काळात सुरक्षितता सुनिश्चित करण्याप्रती त्यांची अतूट बांधिलकी खरोखरच कौतुकास्पद आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने आपत्ती प्रतिसाद आणि व्यवस्थापनातही जागतिक मापदंड प्रस्थापित केले आहेत.
@NDRFHQ
भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं
ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)
Matribhumi Samachar Marathi

