पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स सहित सर्व क्रू-9 अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुरक्षित परतल्याबद्दल मनापासून अभिनंदन केले आहे. क्रू-9 अंतराळवीरांचे धैर्य, दृढनिश्चय व अंतराळ संशोधनासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मोदी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
अंतराळ संशोधनात प्रगती करताना मोठी स्वप्ने पाहणे आणि ती पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याचे धैर्य ठेवणे यात मानवी क्षमतेचा कस लागतो. सुनीता विल्यम्स यात अग्रणी असून त्यांनी आपल्या कारकीर्दीतून सर्वांसाठी एक आदर्श ठेवला आहे.
एक्स वरच्या आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले,
“ सुस्वागतम , क्रू -9! पृथ्वीला तुमची उणीव भासत होती.
जिद्द, धैर्य आणि मानवाच्या अपार विजिगिषु वृत्तीचा कस लागणारा हा काळ होता. चिकाटी काय असते हे सुनीता विल्यम्स व क्रू-9 च्या अंतराळवीरांनी आपल्याला पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. अथांग अज्ञात अंतराळाशी सामना करणारा त्यांचा अविचल दृढनिश्चय कोट्यवधींना सतत प्रेरणा देत राहील.
अंतराळ संशोधनात प्रगती करताना मोठी स्वप्ने पाहणे आणि ती पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याचे धैर्य ठेवणे यात मानवी क्षमतेचा कस लागतो. सुनीता विल्यम्स यात अग्रणी असून त्यांनी आपल्या कारकीर्दीतून सर्वांसाठी एक आदर्श ठेवला आहे.
त्यांच्या परतीचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले त्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे. अचूकता व उत्कटता , तंत्रज्ञान व दृढनिश्चय यांच्या मिलाफातून मानव किती उंची गाठू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे.
@Astro_Suni
@NASA”
Matribhumi Samachar Marathi