Wednesday, December 10 2025 | 09:22:46 PM
Breaking News

मुंबई सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला 25 किलो गांजा केला जप्त

Connect us on:

मुंबई, 19 जून 2025. मुंबई सीमाशुल्क विभाग -III मधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क  अधिकाऱ्यांनी बुधवार, 18 जून , 2025 रोजी थायलंडहून तस्करी केलेले अवैध बाजारात 24.66 कोटी रुपये मूल्य असलेला 24.96 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. या कारवाईत या बेकायदेशीर कृत्यात सहभागी असलेल्या दोन प्रवाशांना आणि ते ताब्यात घेणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली.

बुधवारी, विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे,सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून येणाऱ्या दोन प्रवाशांना अडवले. त्यांच्या सामानाची सखोल तपासणी केली असता व्हॅक्यूम-सील केलेल्या पॅकेजेसमध्ये लपवलेला हायड्रोपोनिक गांजा आढळून आला.

यानंतर, एका समन्वित कारवाईत,हा माल घेण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली. या तिघांवर नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा, 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ  तस्करी टोळीचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे, त्यांच्या  कारवायांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यात महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.

 

About Matribhumi Samachar

Check Also

संचार लेखा नियंत्रक कार्यालयात पणजी येथे पेन्शन अदालतचे आयोजन

पणजी, 9 ऑक्टोबर 2025. संचार लेखा नियंत्रक (सीसीए), महाराष्ट्र आणि गोवा कार्यालयाने आज 9 डिसेंबर …