सेवानिवृत्ती निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (पीएफआरडीए) अध्यक्षपदाची सूत्रे आज शिवसुब्रमण्यम रमण यांनी स्वीकारली. पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पाच वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत, यापैकी जे आधी होईल तोपर्यंत केंद्र सरकारने ही नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना 8 एप्रिल 2025 रोजी जारी झाली.

रमण,1991 च्या तुकडीचे भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा (आयए अँड एएस) अधिकारी आहेत. पीएफआरडीए मध्ये कार्यरत होण्यापूर्वी, त्यांनी केंद्र सरकारच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कार्यालयात उपनियंत्रक आणि महालेखापरीक्षक तसेच मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम केले आहे.
रमण यांनी अर्थशास्त्रात पदवी घेतली असून दिल्ली विद्यापीठातून एमबीए केले आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून वित्तीय नियमनामध्ये मध्ये त्यांनी एमएससी केलं. एलएलबी तसंच इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधून चीफ डिजिटल ऑफिसर सर्टिफिकेशन, फ्लोरिडाच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनल ऑडिटर्स (आयआयए) कडून सर्टिफाइड इंटरनल ऑडिटर क्रेडेन्शियल आणि सिक्युरिटीज लॉ मध्ये पदव्युत्तर पदविका यासारखे अनेक व्यावसायिक आणि शैक्षणिक अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केले आहेत.
सार्वजनिक वित्त, तंत्रज्ञान आणि वित्तीय नियमन या क्षेत्रातील रमण यांच्या गाढा अनुभवासह ते भारताची निवृत्तीवेतन प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी आणि सर्व नागरिकांकरिता सेवानिवृत्ती सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी पीएफआरडीएला मार्गदर्शन करतील.
Matribhumi Samachar Marathi

