नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025
भारताचे जी 20 अध्यक्षपद आणि 2023 मधील शिखर परिषदेसंदर्भात पुस्तक लिहिण्याच्या अमिताभ कांत यांच्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. अमिताभ कांत यांनी या पुस्तकात, पृथ्वीला एक उत्तम ग्रह बनवण्याच्या उद्देशाने मानव-केंद्रित विकासाचा पाठपुरावा करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा धांडोळा,अतिशय सुबोध रीत्या घेतला आहे,असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
अमिताभ कांत यांनी लिहिलेल्या एका पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावर लिहिले आहे :
“भारताचे जी 20 अध्यक्षपद आणि 2023 मधील शिखर परिषदेसंदर्भात पुस्तक लिहिण्याचा तुमचा प्रयत्न प्रशंसनीय आहे, यामध्ये पृथ्वीला एक उत्तम ग्रह बनवण्याच्या उद्देशाने मानव-केंद्रित विकासाच्या भारताच्या प्रयत्नांबाबत स्पष्ट दृष्टिकोन मांडला आहे.@amitabhk87”
भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं
ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)
Matribhumi Samachar Marathi

