Friday, January 02 2026 | 01:31:22 PM
Breaking News

महिला आणि बालविकास मंत्रालय बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेचा 10 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी सज्ज

Connect us on:

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. यंदा बेटी बचाओ, बेटी पढाओ (बीबीबीपी) योजनेचा 10 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालय सज्ज झाले असून या माध्यमातून भारतात बालिकांचे रक्षण, शिक्षण आणि सक्षमीकरण करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या एका दशकाचे महत्त्व समोर आणले जाणार आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ उद्या(22 जानेवारी 2025) नवी दिल्लीत विज्ञान भवनात आयोजित होणार असून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब व्यवहारमंत्री जे. पी. नड्डा, केंद्रीय महिला आणि बाल विकासमंत्री अन्नपूर्णा देवी आणि राज्यमंत्री सावित्री ठाकूर या कार्यक्रमाला उपस्थित असतील.

यामध्ये संरक्षण दले, निमलष्करी दले आणि दिल्ली पोलिसांमधील महिला अधिकारी सहभागी होतील. त्याशिवाय केंद्रीय मंत्रालयातील उपसचिव आणि त्या वरील स्तरातील महिला अधिकारी देखील विज्ञान भवनात उपस्थित असतील. त्याव्यतिरिक्त विद्यार्थिनी( माय भारत स्वयंसेविका) अंगणवाडी पर्यवेक्षक/सेविका आणि राज्य आणि जिल्ह्यांच्या प्रतिनिधींना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात युनिसेफ, यूएन महिला, यूएनडीपी, यूएनएफपीए, जागतिक बँक आणि जर्मन एजन्सी फॉर इंटरनॅशनल को ऑपरेशन(जीआयझेड) यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.

हा 10वा वर्धापन दिन सोहळा 22 जानेवारी 2025 ते 8 मार्च 2025 पर्यंत या दिवशी असलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या कार्यक्रमासोबत जोडून साजरा केला जाईल.  नवी दिल्लीत होणाऱ्या उद्घाटन समारंभात शपथ ग्रहण समारंभ आणि सर्वोत्तम पद्धतींचा शुभारंभ होईल. तसेच मिशन वात्सल्य आणि मिशन शक्ती पोर्टल्स यांचा देखील शुभारंभ यावेळी होईल.अशाच प्रकारचे समारंभ राज्य आणि जिल्हा पातळीवर 22 जानेवारी, 26 जानेवारी आणि 8 मार्च रोजी विशेष कार्यक्रमांसोबत आयोजित केले जातील.

About Matribhumi Samachar

Check Also

आयएनएसव्ही कौंडिण्यने आपल्या पहिल्या सागरी प्रवासाला केली सुरुवात

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2025. भारतीय नौदलाच्या  स्वदेशी बनावटीच्या, पारंपरिक शिवणकाम केलेल्या जहाजाने ‘आयएनएसव्ही कौंडिण्य’ ने …