Monday, January 19 2026 | 06:14:10 PM
Breaking News

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, मुंबईने आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 केला साजरा

Connect us on:

मुंबई, 21 जून 2025. मुंबईतल्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट गॅलरी आणि इशा फाऊंडेशन यानी संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला दि. 20 जून 2025 रोजी दुपारी 12 ते 1 या वेळेत एका विशेष योग सत्राचे आयोजन केले होते.

योग ही एक सर्वांगीण साधना असून, यामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याला अनेक लाभ होतात. नियमित योगाभ्यास केल्याने  लवचिकता, संतुलन आणि शारिरीक क्षमतेत सुधारणा होते. यासोबतच ताण तणावही कमी होत असल्याचे दिसून आले आहे. योग साधनेमुळे मनःशांती, आत्मभान, आणि भावनिक बुद्धिमत्तेलाही मोठी चालना मिळून, उत्तम परस्पर संबंध आणि निर्णय घेण्याची कौशल्ये विकसित होतात.

   

या एका तासाच्या सत्रात नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट गॅलरीचे अधिकारी, संचालिका निधी चौधरी (IAS) आणि उपसंरक्षक श्रुती दास यांच्यासह इतर कार्यालयीन कर्मचारी सहभागी झाले होते. या सत्राला  इशा हठयोग मधून योग प्रशिक्षण घेतलेल्या योग गुरुंनी मार्गदर्शन केले.

आधुनिक कलांचे प्रदर्शन आयोजित करण्याव्यतिरिक्त नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट गॅलरीत सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. याअंतर्गत कला, सर्जनशीलता आणि लोक कल्याण विषयक उपक्रमांचा मिलाफ साधत त्यांना प्रोत्साहन दिले जाते.

About Matribhumi Samachar

Check Also

आयुष निर्यात प्रोत्साहन परिषदेने नवी दिल्ली येथे साजरा केला चौथा स्थापना दिन

भारतीय पारंपरिक औषध प्रणाली आणि आरोग्यविषयक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून …