केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील हस्तशिल्प विकास आयुक्तांच्या मुंबई येथील पश्चिम विभागीय कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात खारघर येथे दिनांक 20 डिसेंबर 2024 ते 21 डिसेंबर 2025 या कालावधीत समर्थ हस्तशिल्प प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विभागीय संचालक (ह) एम प्रभाकरन यांनी हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच या कार्यक्रमाची सुरळीतपणे अंमलबजावणी करण्यासाठी सहाय्यक संचालक सुरेश नारायण तांडेकर यांनी मोठे योगदान दिले. या कार्यक्रमात 30 महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी विकास आयुक्त कार्यालयातर्फे मुख्य प्रशिक्षक म्हणून रंजना यांची तर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून रजनी आणि उशासी यांची नेमणूक करण्यात आली होती.
समर्थ योजनेअंतर्गत महिलांना मधुबनी चित्रकला, वारली चित्रकला, गोंदना चित्रकला शिकवून कपडे, हँडमेड कागद तसेच विक्रीयोग्य इतर वस्तूंवर चित्रे काढण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. महिलांना आत्मनिर्भर करणे हा या प्रशिक्षणाच्या आयोजनाचा उद्देश होता.
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपाचे रायगड जिल्हा सचिव बृजेश पटेल यांनी 21 फेब्रुवारी रोजी समर्थ प्रशिक्षण कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी महिलांच्या कलाकृतींचे कौतुक केले आणि महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी भविष्यात यथाशक्ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
Matribhumi Samachar Marathi

