Sunday, December 21 2025 | 10:54:16 AM
Breaking News

महापेक्स 2025: महाराष्ट्र आणि गोव्याच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या एका प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय टपाल तिकीट प्रदर्शनाचे आयोजन

Connect us on:

मुंबई, 23 जानेवारी 2025

महापेक्स 2025 राज्यस्तरीय टपाल तिकिटांचे प्रदर्शन 22 ते 25 जानेवारी 2025 दरम्यान मुंबईतील कफ परेड भागातील विश्वेश्वरय्या वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे सुरू राहणार आहे. अतिशय प्रतिष्ठेचे हे प्रदर्शन महाराष्ट्र आणि गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक आणि टपाल वारशाचे प्रदर्शन घडवेल, सोबतच या संपूर्ण प्रदेशातील टपाल तिकिटे संग्रहकर्ते, संग्राहक आणि इतिहासप्रेमींना एकत्र येण्याची संधी देईल.

हे प्रदर्शन महाराष्ट्र आणि गोव्याच्या टपाल तिकिटे संग्रहण वारशाचा व्यापक शोध घेण्याचे वचन देत असून यात 475 फ्रेम्स तसेच दुर्मिळ टपाल तिकिटे आणि टपाल कलाकृती प्रदर्शित करणारे 32 विभाग असतील.  या प्रदर्शनाचे एक खास आकर्षण म्हणजे महाराष्ट्राचा राज्य प्राणी, शेकरू, जो या प्रदर्शनाचा अधिकृत शुभंकरही आहे, या प्रदेशाच्या अद्वितीय वन्यजीवांचे आणि वन्यसंस्कृतीचे प्रतिनिधित्व करतो.

या प्रदर्शनात विविध श्रेणीतील स्पर्धा देखील होतील आणि अभ्यागतांना वेगवेगळ्या तिकिटांचे संग्रह पाहण्याची संधी मिळेल. उत्साही लोकांना या प्रदर्शनात दोन्ही राज्यांचे सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक टप्पे प्रतिबिंबित करणारे दुर्मिळ तिकिटे पाहण्याची संधी मिळणार आहे. प्रदर्शनात काही मर्यादित-आवृत्तीत प्रकाशित करण्यात आलेली विशेष टपाल तिकिटे देखील पाहायला मिळणार आहेत. प्रदर्शनाबाबत  अद्यतनित माहिती मिळवण्यासाठी कृपया पुढील अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: www.mahapex2025.com.

About Matribhumi Samachar

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममधील गुवाहाटी इथे लोकप्रिय गोपीनाथ बर्दोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुवाहाटी इथे लोकप्रिय गोपीनाथ बर्दोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल …