नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी काल अलाहाबाद संग्रहालयात भरविण्यात आलेल्या लघुचित्रांवर आधारित ‘भागवत’ प्रदर्शनाचे उद्घाटन केले. महाकुंभाचा पवित्र आणि दिव्य सोहळा आणखी भव्य आणि अनोखा व्हावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. प्रयागराज येथील या ऐतिहासिक वस्तूसंग्रहालयाने जपणूक केलेले ‘भागवत’ प्रदर्शन, हा या विशेष पर्वणीला अधिक वैशिष्ट्यपूर्ण करण्याचा अर्थपूर्ण प्रयत्न आहे. या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून हा अतुलनीय महाकुंभमेळा दिव्य आणि भव्य होत आहे.

त्यानंतर त्यांनी आझाद पथावरील, शिल्पकला प्रदर्शन सभागृह आणि मृत्तिका कला सभागृहाला भेट दिली. त्यावेळी वस्तुसंग्रहालय संचालक श्री राजेश प्रसाद यांनी संग्रहालयाचा समृद्ध इतिहास आणि संग्रह यांचे महत्त्व याविषयी माहिती दिली. केंद्रीय मंत्र्यांनी ‘विविध’ या संग्रहालयाच्या प्रकाशनाच्या त्रैमासिकाचे आणि संग्रहालयाच्या प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेल्या विशेष महाकुंभ तिकीटाचेही प्रकाशन केले. या कार्यक्रमाला संग्रहालयातील सर्व अधिकाऱ्यांसह शहरातील मान्यवर नागरिक उपस्थिती होते.

भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं
ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)
Matribhumi Samachar Marathi

