Monday, December 08 2025 | 08:00:18 PM
Breaking News

प्रजासत्ताक दिन 2025 च्या संचलनात डीआरडीओ ‘रक्षा कवच -बहुक्षेत्रीय धोक्यांविरोधात बहुस्तरीय संरक्षण’ या संकल्पनेसह अग्रणी नवोन्मेषांचे दर्शन घडवणार

Connect us on:

नवी दिल्‍ली, 23 जानेवारी 2025. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे भारताला सक्षम बनवण्याचे आणि संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्याचे ध्येय असलेली संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), 26 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात राष्ट्रीय सुरक्षेसाठी  काही अग्रणी नवोन्मेषांचे दर्शन घडवणार आहे.

रक्षा कवच -बहुक्षेत्रीय धोक्यांविरोधात बहुस्तरीय संरक्षण’ ही संकल्पना असलेल्या डीआरडीओच्या चित्ररथात शीघ्र प्रतिसाद देणारे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र, एअरबोर्न अर्ली वार्निंग एंड कंट्रोल सिस्टम; 155 मिमी/52 कैल एडवांस्ड टोड आर्टिलरी गन सिस्टम; ड्रोन शोधणे, अटकाव करणे आणि नष्ट करणे; उपग्रह-आधारित गस्त प्रणाली; मध्यम शक्ती रडार – अरुध्रा;  प्रगत हलक्या वजनाचे टॉर्पेडो;  लेसर-आधारित निर्देशित ऊर्जा शस्त्र; अत्यंत कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणाली; स्वदेशी मानवरहित हवाई प्रणाली; भूदलांसाठी व्ही/यूएचएफ मॅनपॅक सॉफ्टवेअर डिफाइन्ड रेडिओ; स्वदेशी सुरक्षित उपग्रह फोन आणि यूजीआरएएम असॉल्ट रायफल यांचा समावेश असेल.

याखेरीज डीआरडीओची वर्ष 2024 मधील प्रमुख कामगिरी चित्ररथावरील चित्रांच्या माध्यमातून दर्शवली जाईल. यात लांब पल्ल्याची  हायपरसोनिक जहाज प्रतिरोधी क्षेपणास्त्रे; हलक्या वजनाची बुलेटप्रूफ जॅकेट ‘अभेद’; दिव्यास्‍त्र – मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल; ‘झोरावर’ हा हलक्या वजनाचा रणगाडा आणि डॉर्नियर मिड-लाइफ अपग्रेडसह रडार,  इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, सॉफ्टवेअर डिफाइन्ड रेडिओ आणि इलेक्ट्रो-ऑप्टिक (श्येन) यांचा समावेश आहे.

अचूकता, स्वावलंबन आणि राष्ट्रीय सुरक्षेप्रती असलेली अतूट वचनबद्धता अधोरेखित करत डीआरडीओ,  अत्याधुनिक तंत्रज्ञानासह आरेखित आणि विकसित केलेली, संरक्षण ताकदीत आणखी भर घालणारी  पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी सामरिक क्षेपणास्त्र असलेली  प्रलय शस्त्र प्रणाली दर्शवेल.   डीआरडीओने विकसित केलेल्या इतर अनेक प्रणाली – नाग क्षेपणास्त्र प्रणाली, पिनाका, ब्रह्मोस, शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टम 10 मीटर आणि आकाश शस्त्र प्रणाली,  विविध सशस्त्र दलांच्या तुकड्यांकडून संचलनात  प्रदर्शित केल्या जातील.

‘मेक इन इंडिया अँड मेक फॉर द वर्ल्ड’ हे ध्येय साध्य करण्यासाठी अनेक अत्याधुनिक लष्करी प्रणाली आणि तंत्रज्ञान प्रणाली परिभाषित, आरेखित आणि विकसित  करण्याचे कार्य डीआरडीओ करत आहे. महत्त्वपूर्ण प्रणाली विकसित करण्यासाठी आणि ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला बळ देण्यासाठी डीआरडीओ,  शैक्षणिक संस्था, उद्योग, स्टार्ट-अप आणि सेवा यांच्यासह संरक्षण परिसंस्थेच्या सर्व भागधारकांसोबत भागीदारी करत आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

देशभरातल्या किनारी राज्यांसाठी मत्स्यपालन सहकारी संस्थांसाठी प्रगत क्षमता बांधणी कार्यक्रमाचे व्हॅम्निकॉमकडून आयोजन

वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेने (व्हॅमनिकॉम), नव्या नोंदणीकृत मत्स्यपालन सहकारी संस्थांसाठी सहकारी संस्थांचे प्रशासन …