Monday, January 05 2026 | 09:14:51 AM
Breaking News

भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी माहे ही पाणबुडीविरोधी युद्धनौका सज्ज

Connect us on:

भारतीय नौदल 24 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईतील नौदलाच्या गोदीत माहे श्रेणीमधील माहे ही उथळ पाण्यात संचार करू शकणारी पाणबुडीविरोधी युद्धनौका (एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी) आपल्या ताफ्यात दाखल करणार आहे.

पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिस कमांडिंग – इन- चीफ व्हाईस अॅडमिरल स्वामीनाथन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी भूषवणार आहेत.

माहेचा नौदलाच्या ताफ्यातील समावेश  हे उथळ पाण्यात संचार करू शकणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या  युद्धनौकांच्या नव्या आवृत्तीच्या आगमनाचे प्रतीक ठरेल. आकर्षक, वेगवान आणि पूर्णपणे भारतीय अशी ही युद्धनौका आहे. यात 80 टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटकांसह माहे श्रेणीची ही युद्धनौका रचना, बांधणी आणि एकत्रीकरणातील भारताच्या वाढत्या प्रावीण्याचे दर्शन घडवते.

देशाच्या पश्चिम सागरकिनाऱ्यावर ती ‘सायलेंट हंटर’ म्हणून काम करेल.  स्वावलंबनाच्या बळावर आणि भारताच्या सागरी सीमांचे संरक्षण करण्यासाठी ती पूर्णपणे समर्पित आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

आयुष निर्यात प्रोत्साहन परिषदेने नवी दिल्ली येथे साजरा केला चौथा स्थापना दिन

भारतीय पारंपरिक औषध प्रणाली आणि आरोग्यविषयक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून …