Saturday, January 03 2026 | 09:27:04 AM
Breaking News

पराक्रम दिनानिमित्त मुंबईतील कुलाबा येथील पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 3 येथे प्रश्नमंजुषेचे आयोजन

Connect us on:

परीक्षा पे चर्चा 2025 या कार्यक्रमांतर्गत  नेताजी सुभाषचंद्र बोस (पराक्रम दिवस) यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी 2025 रोजी मुंबईतील कुलाबा येथील पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 3 येथे  प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 व क्रमांक 2, आर्मी पब्लिक विद्यालय, गोपी  बिर्ला विद्यालयसह विविध शाळांमधील 100 स्पर्धक यात  सहभागी झाले होते.  या स्पर्धेपूर्वी, “भारत हैं हम” या मालिकेचे पाच भाग स्पर्धकांना दाखविण्यात आले आणि या  भागांच्या आधारे, एक ऑफलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली.  ‘भारत हैं हम’ ही मालिका भारताच्या शूर सुपुत्रांना समर्पित आहे.

स्पर्धेनंतर लगेचच पारितोषिक वितरण समारंभ झाला आणि प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक सुरेश यादव यांच्यासह विद्यालय व्यवस्थापन समितीचे नामनिर्देशित अध्यक्ष कमांडर ॲनी नागराजा, आयएनएस कुंजली हे यावेळी उपस्थित होते.  प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नेताजींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाला आरंभ झाला. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला आणि विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली.  नेताजींसारखे व्यक्तिमत्व होणे सोपे नाही, त्यामुळे या महान  नेत्याचे गुण आत्मसात करून भविष्यात मोठी उंची गाठण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे,असे प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात सांगितले. मोहम्मद  मोहसीन यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पाहुणे, विद्यार्थी आणि शिक्षकांचे आभार मानले.त्यानंतर  कार्यक्रमाची सांगता झाली.

About Matribhumi Samachar

Check Also

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्‍ये एनआयटी जमशेदपूरचा दीक्षांत समारंभ

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2025. राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्‍ये  आज (29 डिसेंबर, 2025) झारखंडमधील जमशेदपूर …