Sunday, January 04 2026 | 10:22:42 PM
Breaking News

चीनमधील किंगदाओ इथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी होणार

Connect us on:

चीनमधील किंगदाओ 25 ते 26 जून 2025 या कालावधीत यंदाची शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ ) संरक्षण मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारताच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. या बैठकीत, संरक्षण मंत्री प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा, दहशतवादविरोधी प्रयत्न आणि शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांच्या संरक्षण मंत्रालयांमधील परस्पर सहकार्य यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा करतील अशी अपेक्षा आहे.

या बैठकीत संरक्षण मंत्री शांघाय सहकार्य संघटनेची तत्वे आणि नियमांप्रती भारताची बांधिलकी, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करण्यासंबंधीचा भारताचा दृष्टीकोन, या प्रदेशातील दहशतवाद आणि कट्टरवादाचे उच्चाटन करण्यासाठी एकत्रित आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे आवाहन, तसेच शांघाय सहकार्य संघटनेअंतर्गत अधिकाधिक व्यापार, आर्थिक सहकार्य आणि दळणवळणी जोडणीची गरज अधोरेखित करतील अशी अपेक्षा आहे. ते या बैठकीच्या पार्श्वभूमीवर चीन आणि रशियासह काही सहभागी देशांच्या संरक्षण मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत.

या प्रदेशातली बहुपक्षीयता, राजकीय , सुरक्षा, आर्थिक तसेच नागरिकांमधील परस्पर संपर्क वाढवण्याच्या अनुषंगाने भारत शांघाय सहकार्य संघटनेला विशेष महत्त्वाचे मानतो. शांघाय सहकार्य संघटनेचे धोरण राष्ट्रांचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता, अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप टाळणे, परस्पर आदर, समंजसपणा आणि सर्व सदस्य राष्ट्रांच्या समानतेच्या तत्त्वांवर आधारलेले आहे.

शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना 2001 मध्ये झाली होती. ही एक आंतर-सरकारी संस्था आहे. भारत 2017 मध्ये या संस्थेचा पूर्ण सदस्य बनला, त्यानंतर 2023 मध्ये भारताने पहिल्यांदा संघटनेचे फिरते अध्यक्षपद भूषवले होते. यंदा 2025चे अध्यक्षपद चीनकडे असून, Upholding the Shanghai Spirit: SCO on the Move या संकल्पनेअंतर्गत या बैठकीचे आयोजन केले गेले आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

1 जानेवारी 2026 पासून भारत स्विकारणार ‘किंबर्ले प्रोसेस’ या यंत्रणेचे प्रतिष्ठित अध्यक्षपद

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2025. ‘किंबर्ले प्रोसेस’ च्या (KP – जगभरातील कच्च्या हिऱ्यांचा व्यापार सुरक्षित व …