Friday, March 06 2026 | 06:11:28 AM
Breaking News

केंद्र सरकार 26 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे करणार आयोजन

Connect us on:

नवी दिल्‍ली, 25 जून 2025

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत असलेल्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने  आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त  26 जून 2024 रोजी नवी दिल्लीतल्या डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे एका कार्यक्रम आयोजित केला आहे. . या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री  बी. एल. वर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील तसेच  विभागाचे  वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय हे देशातील अमली पदार्थांची मागणी कमी करण्यासाठी नोडल मंत्रालय आहे, जे अमली पदार्थांच्या गैरवापराला प्रतिबंध, समस्येच्या व्याप्तीचे मूल्यांकन, प्रतिबंधात्मक कारवाई, वापरकर्त्यांचे उपचार आणि पुनर्वसन, माहिती प्रसार या सर्व पैलूंमध्ये  समन्वय राखून  देखरेख करते.

अमली पदार्थांच्या सेवनाविरुद्ध समाजजागृती करण्यासाठी मंत्रालयाने देशातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये नशा मुक्त भारत अभियान ही महत्ताकांक्षी मोहीम कार्यान्वित केली असून उच्च शिक्षण संस्था, विद्यापीठ परिसर, शाळा आणि समुदायापर्यंत पोहोचून त्यांच्यात अमली पदार्थांच्या गैरवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि या अभियानाला समाजाकडून प्रतिसाद मिळावा यासाठी त्याबद्दल आपुलकी निर्माण करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.

नशा मुक्त भारत अभियानाची कामगिरी:

  1. आतापर्यंत, प्रत्यक्ष राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांद्वारे, 15.78  कोटी हून अधिक  लोकांना अमली पदार्थांच्या वापराबद्दल जागृत  करण्यात आले आहे यामध्ये  5.26 कोटी हून अधिक   तरुण आणि 3.31कोटी हून अधिक महिलांचा समावेश आहे.
  2. 4.31 लाख हून अधिक शैक्षणिक संस्थांच्या सहभागामुळे अभियानाचा संदेश देशातील मुले आणि तरुणांपर्यंत पोहोचला आहे.
  3. 20,000 हून अधिक मुख्य स्वयंसेवकांची एक मजबूत टीम तयार करण्यात आली असून  त्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.
  4. अभियानच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील अधिकृत सोशल मीडिया खात्यांद्वारे जनजागृती.
  5. NMBA शी संबंधित उपक्रमांची माहिती गोळा करून ती संकलित करण्यासाठी आणि जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील NMBA डॅशबोर्डवर जिल्हा आणि मुख्य स्वयंसेवकांनी रिअल-टाइम आधारावर संकलित केलेली माहिती दर्शविणारे NMBA मोबाइल ऍप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले आहे.
  6. NMBA संकेतस्थळ (http://nmba.dosje.gov.in) अभियान, ऑनलाइन चर्चा मंच, NMBA डॅशबोर्ड, ई-प्रतिज्ञा याबद्दल वापरकर्त्यांना/ दर्शकांना तपशीलवार माहिती आणि अंतर्दृष्टी पुरविते
  7. 99,595 शैक्षणिक संस्थांमधील 1.67 कोटींहून अधिक विद्यार्थी अंमली पदार्थांपासून मुक्त होण्याबाबतची राष्ट्रीय ऑनलाइन प्रतिज्ञा घेत आहेत.
  8. युवक आणि इतर भागधारकांना सहभागी करून घेण्यासाठी आणि त्यांना यामध्ये  जोडून घेण्यासाठी ‘नशे से आझादी- एक राष्ट्रीय युवा आणि विद्यार्थी संवाद कार्यक्रम’, ‘नया भारत, नशा मुक्त भारत’, ‘एनएमबीए इंटरॅक्शन विथ एनसीसी’ यासारखे कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जात आहेत.
  9. आर्ट ऑफ लिव्हिंग, ब्रह्म कुमारी, संत निरंकारी मिशन, रामचंद्र मिशन (दाजी), इस्कॉन आणि ऑल वर्ल्ड गायत्री परिवार यांसारख्या आध्यात्मिक/सामाजिक सेवा संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
  10. लोकांना सहजपणे प्रवेश मिळावा यासाठी सर्व व्यसनमुक्ती सुविधा जिओ टॅग करण्यात आल्या आहेत.

पदार्थ वापर विकार (SUD )ही देशाच्या सामाजिक जडणघडणीवर विपरित परिणाम करणारी समस्या आहे. कोणत्याही पदार्थाच्या आहारी जाण्यामुळे केवळ व्यक्तीच्या आरोग्यावरच परिणाम होत नाही, तर तिचे कुटुंब आणि संपूर्ण समाजही विस्कळीत होते.  विविध सायकोएक्टिव्ह पदार्थांचे नियमित सेवन केल्याचा परिणाम व्यक्तीचे त्यावरील अवलंबित्व वाढण्यात होतो. काही पदार्थ संयुगांमुळे चेता-मानसिक विकार, हृदय आणि रक्तवाहिन्यांचे रोग होतात तसेच अपघात, आत्महत्या आणि हिंसा होऊ शकतात. म्हणून, पदार्थांचा वापर  करणे आणि त्यावर अवलंबून असणे ही मानसिक-वैद्यकीय समस्या मानली पाहिजे.

About Matribhumi Samachar

Check Also

आयुष निर्यात प्रोत्साहन परिषदेने नवी दिल्ली येथे साजरा केला चौथा स्थापना दिन

भारतीय पारंपरिक औषध प्रणाली आणि आरोग्यविषयक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून …