Sunday, January 18 2026 | 08:40:05 AM
Breaking News

आणीबाणीच्या घोषणेला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केलेल्या ठरावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Connect us on:

नवी दिल्‍ली, 25 जून 2025. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, आणीबाणीला आणि भारतीय राज्यघटनेचा आत्मा भंग करण्याच्या प्रयत्नांचा धाडसाने प्रतिकार करणाऱ्या असंख्य व्यक्तींच्या बलिदानाचे स्मरण आणि सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला. नवनिर्माण आंदोलन आणि संपूर्ण क्रांती अभियान चिरडण्याच्या जोरदार प्रयत्नांतर्गत 1974 मध्ये याची सुरुवात झाली होती.

या घटनेची आठवण म्हणून आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले तसेच आणीबाणीमध्ये ज्यांचे राज्यघटनेने दिलेले लोकशाही अधिकार हिरावून घेतले गेले आणि ज्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले अशा व्यक्तींना श्रद्धांजलीही वाहण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यांच्या असाधारण धैर्याला आणि आणीबाणीच्या अतिरेकाला खंबीरपणे प्रतिकार करण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या धैर्याला अभिवादन केले.

जेव्हा राज्यघटना कमकुवत करण्याचे प्रयत्न करण्यात आले, भारतीय प्रजासत्ताक आणि लोकशाही भावनेवर घाला घातला गेला, संघराज्यवादाला धक्का पोहोचवला गेला तसेच मूलभूत हक्क, मानवी स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा राखणे स्थगित करण्यात आले, त्या भारताच्या इतिहासातील विसरता न येणाऱ्या अध्यायाला, संविधान हत्या दिवसाला यंदा, 2025 मध्ये- 50 वर्षे पूर्ण झाली आहेत.

भारतातील नागरिकांचा भारतीय राज्यघटनेवरील आणि देशाच्या लोकशाही मूल्यांच्या लवचिकतेवरील अढळ विश्वास कायम राहील याचाही केंद्रीय मंत्रिमंडळाने पुनरुच्चार केला. ज्यांनी हुकूमशाही प्रवृत्तींना विरोध केला तसेच आपली राज्यघटना आणि तिची लोकशाहीची वीण यांचे रक्षण करण्यासाठी जे खंबीरपणे उभे राहिले त्यांच्यापासून प्रेरणा घेणे तरुणांइतकेच ज्येष्ठांसाठी महत्त्वाचे आहे.

लोकशाहीची जननी या नात्याने भारत संवैधानिक मूल्यांची जोपासना, जतन आणि रक्षण यांचे ठळक उदाहरण आहे.

एक राष्ट्र म्हणून आपण आपली राज्यघटना आणि त्याची लोकशाही आणि संघराज्याची भावना जपण्याचा पुन्हा नव्याने निर्धार करूया.

About Matribhumi Samachar

Check Also

आयुष निर्यात प्रोत्साहन परिषदेने नवी दिल्ली येथे साजरा केला चौथा स्थापना दिन

भारतीय पारंपरिक औषध प्रणाली आणि आरोग्यविषयक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून …