नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पीयूष गोयल यांच्या इस्रायल दौऱ्याचा (20–22 नोव्हेंबर 2025) यशस्वी समारोप झाला असून या दौऱ्यात त्यांनी भारत-इस्रायल धोरणात्मक आणि आर्थिक भागीदारी बळकट करण्याच्या उद्देशाने उच्चस्तरीय बैठका घेतल्या.
गोयल यांनी या दौऱ्यात इस्रायलचे अर्थव्यवस्था आणि उद्योग मंत्री नीर बरकत, अर्थमंत्री बेझालेल स्मोट्रिच, कृषी आणि अन्न सुरक्षा मंत्री अवी डिच्टर यांच्यासोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. इस्त्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग आणि पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची त्यांनी भेट घेतली.
इस्रायलचे अर्थव्यवस्था आणि उद्योग मंत्री नीर बरकत यांच्याशी झालेल्या चर्चेत मुक्त व्यापार करारावरील चर्चेचा समावेश होता. भारत-इस्रायल मुक्त व्यापार कराराच्या विचारार्थ विषयांवर स्वाक्षरी करणे हा एक महत्त्वाचा टप्पा होता. संतुलित आणि परस्पर फायदेशीर परिणामासाठी संरचित वाटाघाटींच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
चेक पॉइंट, आयडीई टेक्नॉलॉजीज, एनटीए आणि नेटाफिम यासारख्या आघाडीच्या इस्रायली कंपन्यांच्या नेतृत्वाशी गोयल यांनी संवाद साधला. यात सायबर सुरक्षा, डिसॅलिनेशन(पृथ:करण) आणि सांडपाणी व्यवस्थापन, मेट्रो आणि शहरी गतिशीलता उपाय आणि हवामानाचा अचूक अंदाज लक्षात घेवून शेती या क्षेत्रातील भागीदारीवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी, गोयल यांनी इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतली आणि त्यांना यशस्वीपणे आयोजित केलेल्या भारत-इस्रायल व्यापार मंच आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाची माहिती दिली आणि कृषी, पाणी, संरक्षण, सायबर सुरक्षा, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि नवोपक्रम या क्षेत्रात द्विपक्षीय आर्थिक आणि धोरणात्मक सहकार्य वृद्धिंगत करण्यावर चर्चा केली.
यावेळी 60 हून अधिक भारतीय व्यावसायिकांच्या प्रतिनिधीमंडळाने इस्रायलमध्ये अभ्यासपूर्ण स्थळांना भेटी दिल्या पेरेस सेंटर फॉर पीस अँड इनोव्हेशनमध्ये नवोपक्रम, चेक पॉइंट येथे सायबरसुरक्षा नेतृत्व, शेबा रुग्णालयातील आरोग्यसेवेतील प्रगती आणि ऍग्री फार्म भेटीदरम्यान शाश्वत शेतीतील सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास त्यांनी केला.
या भेटीमुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी, तंत्रज्ञान-आधारित सहकार्याला गती देण्यासाठी आणि धोरणात्मक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये भागीदारी वाढविण्याच्या दृढ वचनबद्धतेची पुष्टी झाली, जी भारत-इस्रायल संबंधांच्या पुढील टप्प्यात एक महत्त्वाचे पाऊल आहे.
Matribhumi Samachar Marathi

