Monday, December 08 2025 | 08:09:58 AM
Breaking News

प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुबियांतो यांची उपस्थिती ही दोन्ही देशांमधील दीर्घकालीन संबंध अधोरेखित करते: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Connect us on:

राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी आज  (25 जानेवारी 2025) राष्ट्रपती भवन येथे इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांचे स्वागत केले. राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांच्या सन्मानार्थ एक मेजवानीही आयोजित केली.

भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सांस्कृतिक संबंध हजारो वर्षांपूर्वी पासूनचे आहेत, असे राष्ट्रपतींनी सुबियांतो यांचे स्वागत करताना सांगितले.  बहुत्ववाद, समावेशकता आणि कायद्याचे राज्य, ही दोन्ही देशांमधली समान मूल्ये आहेत आणि या सामायिक मूल्यांनी आपल्या आधुनिक काळातील संबंधांना दिशा दिली आहे, असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रपती सुबियांतो यांनी  प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांचे आभार मानले.

हा एक ऐतिहासिक क्षण आहे कारण, 75 वर्षांपूर्वी 1950 मध्ये पहिल्या प्रजासत्ताक दिनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकार्णो हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. हे आपल्या दोन देशांमधील दीर्घकालीन संबंध आणि बळकट लोकशाही परंपरेचे प्रतीक आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

राष्ट्रपती मुर्मू यांनी  भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील हजारो वर्षांपूर्वीच्या सांस्कृतिक संबंधांचीही आठवण करून दिली. यात ओडिशामध्ये साजरी होणाऱ्या ‘बाली जत्रा’चा त्यांनी उल्लेख केला.  प्राचीन काळी भारतातून बालीपर्यंत आणि हिंद-प्रशांतच्या इतर क्षेत्रांमध्ये जलप्रवास करणाऱ्या  भारतातील खलाशी व व्यापाऱ्यांच्या परंपरेचे स्मरण करते.

सध्याच्या काळात आपले मोठे उदयोन्मुख बाजार, भौगोलिक जवळीक आणि आर्थिक रचनेतील साम्ये ही द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी मोठी क्षमता प्रदान करत आहेत, असे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.

राष्ट्रपतींनी नमूद केले की, संरक्षण आणि अवकाश सहकार्य हे आपल्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये प्रमुख घटक म्हणून उदयास येत आहेत.

इंडोनेशिया हा भारताच्या दक्षिण- पूर्व आशियाई देशांशी आर्थिक, सांस्कृतिक आणि राजनैतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणाचा आणि हिंद- प्रशांत दृष्टीकोनाचा महत्त्वाचा स्तंभ आहे, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपतींनी असेही सांगितले की, ग्लोबल साऊथ देशांमधील अग्रणी सदस्य म्हणून भारत आणि इंडोनेशिया बहुपक्षीय व्यासपीठांवर एकत्रित सहकार्य करतात. यामध्ये जी-20 आणि आग्नेय आशियाई राष्ट्रांचा संघ -आसियानचा समावेश आहे. त्यांनी इंडोनेशियाला ब्रिक्स समूहात  कायम सदस्यत्व मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

व्यापक धोरणात्मक भागीदार म्हणून भारत आणि इंडोनेशिया अनेक नवीन क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवत आहेत. या भेटीमुळे याला आणखी बळकटी प्राप्त होईल, यावर  दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.

About Matribhumi Samachar

Check Also

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन

महामहीम, माझे मित्र राष्ट्रपती पुतीन दोन्ही देशांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे सहकारी नमस्कार! “दोबरी देन”! आज भारत …