वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) मुंबईच्या इनोव्हेशन कॉम्प्लेक्सच्या उद्घाटन समारंभात, गोव्यातील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेने (CSIR-NIO) सागरी जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवोन्मेषाला चालना देण्यासाठी आघाडीच्या कंपन्यांसोबत नॉन-डिस्क्लोजर अर्थात प्रकटीकरण न करणाऱ्या करारावर (NDA) आणि सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली.

या कार्यक्रमाला नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. सारस्वत आणि डॉ. व्ही. के. पॉल सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (CSIR) महासंचालक डॉ. एन. कलैसेल्वी तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाचे (DSIR) सचिव यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर आणि नॉन-डिस्क्लोजर करारावर (NDA) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
सागरी सूक्ष्म शैवालांपासून उच्च-मूल्य असलेले बायोएक्टिव्ह रंगद्रव्य ‘फ्यूकोक्सॅन्थिन’चे उत्पादन वाढवण्यासाठी राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेने सुरतमधील शैवा अल्गाटेक एलएलपी सोबत नॉन-डिस्क्लोजर करार केला. सागरी एक्स्ट्रोमोफाईल ( असा जीव जो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील जीवंत राहू शकतो) प्राण्यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने विशेष माध्यमांच्या विकासासाठी मुंबईतील हायमीडिया लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड सोबत एक सामंजस्य करार यावेळी करण्यात आला. पर्यावरणपूरक प्रदूषण नियंत्रण आणि कचरा प्रक्रिया यासाठी सागरी सूक्ष्मजीवांचा वापर करून शाश्वत जैवउपचार उपाय विकसित करण्यासाठी मुंबईतील ऑर्गेनिका बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड सोबत आणखी एक सामंजस्य करार करण्यात आला.

एनआयओचे संचालक डॉ. सुनील कुमार सिंग आणि सहयोगी कंपन्यांच्या प्रतिनिधी म्हणजेच शैवा अल्गाटेक एलएलपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशराज एम. जरीवाला; हायमीडिया लॅबोरेटरीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. गिरीश महाजन; आणि ऑर्गेनिका बायोटेकचे संशोधन आणि विकास प्रमुख डॉ. प्रफुल्ल रणदिवे यांच्यासोबत करारांची देवाणघेवाण केली.
सीएनआयओचे पेटंट आणि तंत्रज्ञान विभागाचे समन्वयक डॉ. नरसिंह ठाकूर आणि एनआयओचे सामंजस्य करार विभागाचे डॉ. जगदीश पाटील यांनी हे सहकार्य करार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
या समारंभात बायो-प्रॉस्पेक्टिंगमध्ये (औषधे, जैवरसायने आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वापूर्ण साहित्य मिळवता येईल अशा वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींचा शोध) सागरी सजीव संसाधनांच्या शाश्वत वापरासाठी मजबूत उद्योग सहकार्य निर्माण करण्यावर एनआयओ चा भर दिसून आला.
7N4P.jpeg)
Matribhumi Samachar Marathi

