Thursday, January 08 2026 | 06:55:10 PM
Breaking News

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह 28.01.2025 रोजी नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र जनपथ येथे हातमाग परिषदेचे उद्घाटन करणार आहेत

Connect us on:

“हँडलूम कॉन्क्लेव्ह- मंथन” ही हातमाग विणकर/उत्पादक, किरकोळ विक्रेते, खरेदीदार, डिझायनर, शिक्षणतज्ज्ञ, स्टार्टअप संस्थापक, हातमाग उद्योजक/नवोन्मेषक, हातमाग सहकारी संस्था, ई-वाणिज्य कंपन्या अशा हातमाग क्षेत्रातील विविध भागधारकांसाठी तसेच माननीय पंतप्रधानांच्या 5एफ व्हिजन – शेती ते फायबर ते कारखाना ते फॅशन ते परदेश  अशा सर्व विभागांमधील हातमाग क्षेत्राचा भविष्यातील रोड मॅप तयार करण्यासाठी संवादात्मक कार्यशाळा आहे. या परिषदेत सुमारे  250 भागधारक उपस्थित राहणार आहेत, ज्यात 21 पॅनलिस्ट, देशाच्या विविध भागातून येणारे 120 हातमाग लाभार्थी, विणकर सेवा केंद्रे आणि आयआयएचटीचे  35 अधिकारी, सुमारे 25 राज्य सरकारी अधिकारी (हातमाग, रेशीम आणि वस्त्रोद्योग) आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या विविध विभाग आणि आस्थापनांचे अधिकारी यांचा समावेश असेल. या परिषदेचे उद्दिष्ट विविध भागधारकांना एकत्र येऊन हातमाग क्षेत्रातील वाढीसाठी सर्वोत्तम पद्धती, नवोपक्रम आणि धोरणे सामायिक करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे आहे.

हा उपक्रम विणकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि एकूणच हातमाग उद्योग सुधारण्यासाठी सरकारच्या सुरू असलेल्या प्रयत्नांशी सुसंगत आहे. यामुळे हातमाग क्षेत्राला विकसित भारत 2047 साठी विकास इंजिन म्हणून काम करण्याची प्रचंड क्षमता असलेले एक प्रमुख क्षेत्र म्हणून विकसित करण्यास मदत होईल.

माननीय केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. सचिव (वस्त्रोद्योग) आणि हातमाग विकास आयुक्त यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला  माननीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री सन्माननीय पाहुणे असतील,

कार्यक्रमाचे प्रमुख मुद्दे:

यात 03 तांत्रिक सत्रे असतील:

हातमाग क्षेत्रातील स्टार्ट-अप परिसंस्थेला पाठिंबा.

हातमाग विपणन मार्ग आणि रणनीती.

तरुण विणकरांसाठी हातमाग क्षेत्राचे प्रारूप: दृष्टिकोन आणि रणनीती.

“हातमाग क्षेत्रात स्टार्ट-अप वातावरणाला पाठिंबा” या विषयावरील तांत्रिक सत्रात स्टार्ट-अप्स आणि तरुण उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी तसेच हातमाग क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्ट-अप्ससाठी एक मजबूत परिसंस्था तयार करण्यासाठी उपायुक्त (हातमाग) कार्यालयाच्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला जाईल.

“हातमाग विपणन मार्ग आणि रणनीती” या विषयावरील पॅनेल चर्चेत मान्यवर पॅनेल सदस्य आपले हातमाग विपणनाचे अनुभव आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करतील. ही चर्चा इच्छुक उद्योजक, संस्था आणि संपूर्ण हातमाग क्षेत्रासाठी उपयुक्त ठरेल.

अंतिम सत्र तरुण पिढीसाठी हातमाग क्षेत्र आकर्षक बनवण्यासाठी तसेच विविध तांत्रिक हस्तक्षेप आणि सामाजिक व डिजिटल माध्यमांच्या मदतीने अधिक मूल्य प्रस्तावांचा समावेश करून हातमाग क्षेत्रात अधिक गतिमान आणि शाश्वत मूल्य साखळी तयार करण्यासाठी तरुणांना सहभागी करून घेण्याबाबतच्या  विविध धोरणांवर चर्चा करण्यावर केंद्रित असेल.

वरील तांत्रिक सत्रांचे पॅनेल सदस्य हे सरकारी अधिकारी, तांत्रिक तज्ञ, स्टार्ट-अप संस्थापक, हातमाग सहकारी संस्था, उत्पादक कंपन्या, एन आय एफ टी आणि इतर संस्थांमधील शिक्षणतज्ज्ञ, ई-कॉमर्स स्टोअर्स, हातमाग किरकोळ विक्रेते, विणकर उद्योजक/नवोन्मेषक, शाश्वत ब्रँड, हातमाग निर्यातदार आणि डिझायनर्स यासारख्या संपूर्ण हातमाग मूल्य साखळीतील विविध घटकांचे प्रतिनिधित्व करतील; त्यांच्या मौल्यवान अंतर्दृष्टीचा फायदा मंथन हातमाग परिषदेत उपस्थित असलेल्या संपूर्ण हातमाग समुदायाला होईल.

About Matribhumi Samachar

Check Also

रिलॅक्सो फूटवेअरने स्प्रिंग समर २०२६ कलेक्शनमध्ये बोल्ड आणि रोमांचक श्रेणी केली सादर

मुंबई, महाराष्ट्र, जानेवारी 2026: भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात विश्वासार्ह फूटवेअर उत्पादक कंपनी रिलॅक्सो फूटवेअर्स …