भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) मुंबई शाखा कार्यालय-1 ने सायली पदवी महाविद्यालयाचे आणि कृतज्ञता फाऊन्डेशन यांच्या सहकार्याने शनिवारी (25 जानेवारी 2025) मुंबईतील बोरिवली येथील सायली पदवी महाविद्यालय येथे ‘क्वालिटी रन’चे आयोजन केले होते. दैनंदिन जीवनात गुणवत्ता आणि उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठीच्या वचनबद्धतेने एकत्रित येत 1,200 हून अधिक लोकांनी या दौडमध्ये सहभाग नोंदवला.
समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये गुणवत्ता मानकांचे महत्त्व आणि त्यांची भूमिका याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मॅरेथॉन आणि पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाने सहभागींना गुणवत्ता, सुरक्षितता आणि शाश्वततेचे महत्त्व पटवून देत प्रत्यक्ष उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिली.

शनिवारी सकाळी 6:30 वाजता बीआयएस च्या पश्चिम विभागाचे उपमहासंचालक संजय गोस्वामी; बीआयएस मुंबई शाखा कार्यालय-1 चे शास्त्रज्ञ-ई/संचालक आणि प्रमुख पिनाकी गुप्ता; सायली पदवी महाविद्यालयाचे डॉ. आशिर्वाद लोखंडे; आणि कृतज्ञता फाऊन्डेशनच्या डॉ. प्रज्ञा आशीर्वाद यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या गटाने या कार्यक्रमाला अधिकृतपणे हिरवा झेंडा दाखवला. समाजाचे चांगले भविष्य घडवण्यात गुणवत्तेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर देण्यासाठी सुरू असलेल्या सामूहिक प्रयत्नांवर सर्व मान्यवरांनी प्रकाश टाकला. “‘क्वालिटी रन’मध्ये इतक्या मोठ्या संख्येचा सहभाग पाहून आम्हाला आनंद होत आहे. हा कार्यक्रम जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये गुणवत्तेचे महत्त्व अधोरेखित करतो आणि या उपक्रमाद्वारे आम्ही लोकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे,” असे भारतीय मानक ब्युरोच्या प्रवक्त्याने सांगितले.

‘क्वालिटी रन’मध्ये गुणवत्ता मानकांबद्दल माहिती पसरवण्यासाठी तसेच निरोगी, अधिक सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी तयार केलेले विविध उपक्रम देखील राबवण्यात आले. हा कार्यक्रम सायली पदवी महाविद्यालयात झाला. सायली पदवी महाविद्यालय हे एम जे कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, गोराई मार्ग, एमएचबी वसाहत, म्हाडा वसाहत, बोरिवली, मुंबई येथे आहे. सहभागींना एकत्र येऊन सकारात्मक कृती आणि उत्साहाने दिवसाची सुरुवात करण्यासाठी या ठिकाणाने एक मध्यवर्ती बिंदू म्हणून काम केले.

“अशा अर्थपूर्ण कारणासाठी बीआयएस आणि कृतज्ञता फाऊन्डेशनसोबत भागीदारी करण्यातून आम्हाला आनंद होत आहे. आजच्या सहभागातून गुणवत्ता-केंद्रित भविष्य घडवण्यात सामूहिक रस दिसून येतो. त्यामुळे आम्ही अशाच प्रकारचे आणखी कार्यक्रम आयोजित करण्यास उत्सुक आहोत,” असे सायली पदवी महाविद्यालयाच्या प्रतिनिधीने याप्रसंगी सांगितले.



Matribhumi Samachar Marathi

