Tuesday, December 09 2025 | 08:34:11 PM
Breaking News

पंचायती राज प्रतिनिधींचा नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर 76 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभाग

Connect us on:

दिल्ली, 26 जानेवारी 2025. 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभरातील पंचायती राज संस्थांचे 575 हून अधिक निवडून आलेले प्रतिनिधी आणि त्यांच्या पत्नी विशेष अतिथी म्हणून भव्य प्रजासत्ताक दिन संचलनाला उपस्थित होते. यात ग्रामीण भारताचे प्रतिबिंब दिसून आले. सुमारे 40% महिलांचा यात सहभाग होता. समावेशक शासनाच्या संकल्पनेमध्ये झालेली वैशिष्ट्यपूर्ण प्रगती याद्वारे अधोरेखित झाली.

ग्रामीण लोकशाहीचा सन्मान करण्याच्या उद्देशाने पंचायती राज मंत्रालयाने 25 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीत सरपंच, ग्राम प्रधान आणि इतर पंचायती राज प्रतिनिधींचा सत्कार केला. हे विशेष अतिथी त्यांच्या ग्राम पंचायतींमध्ये सरकारच्या 10 प्रमुख योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार विजेते म्हणून परिचित आहेत. या योजनांमध्ये हर घर जल योजना,  प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), मिशन इंद्रधनुष्य, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (आयुष्मान भारत), प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री पोषण योजना, पीएम मुद्रा योजना, पीएम विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आणि किसान क्रेडिट कार्ड योजना यांचा समावेश आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नवी दिल्लीत आयोजित पंचायती राज प्रमुखांच्या सत्कार समारंभात केंद्रीय पंचायती राज मंत्री  राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी सांगितले की, पंचायती राज नेते ग्रामीण परिवर्तनाचे प्रेरणास्थान आहेत. ते सरकारी प्रमुख योजनांची अंमलबजावणी अखंडपणे करण्यासाठी आणि भारतात सहभागी लोकशाहीचा आत्मा बळकट करण्यासाठी जबाबदार आहेत. त्यांनी सांगितले की, या नेत्यांनी त्यांच्या ग्राम पंचायतींमध्ये परिणामकारक अंमलबजावणी करून जीवन जगणे सोपे करण्याच्या उद्देशाने सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिन परेडमध्ये 575 हून अधिक पंचायती प्रतिनिधी व त्यांच्या पत्नी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. या प्रतिनिधींची उपस्थिती कर्मभूमीपासून कर्तव्य पथापर्यंतच्या त्यांच्या प्रवासाचे प्रतीक आहे.  राजीव रंजन सिंह यांनी पंचायती राज संस्थांमधील महिलांच्या महत्त्वपूर्ण नेतृत्वाचे कौतुक केले. यात 132 सरपंच- महिला प्रधान विशेष अतिथी होते. यामुळे ग्रामीण शासनात त्यांच्या परिवर्तनशील भूमिकेचा परिचय झाला.

या कार्यक्रमात ग्रामोदय संकल्प पत्रिकेच्या 15 व्या ई-संस्करणाचे प्रकाशन करण्यात आले आणि संविधान दिन प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पंचायती राज मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी  सुषील कुमार लोहरी, अतिरिक्त सचिव;  आलोक प्रेम नागर, संयुक्त सचिव;  (डॉ.) बिजया कुमार बेहेरा, आर्थिक सल्लागार; आणि  राजेश कुमार सिंह, संयुक्त सचिव देखील उपस्थित होते.

SH1_6220.JPG

SH1_6299.JPG

SH1_6304.JPG

WhatsApp Image 2025-01-26 at 13.26.10.jpeg

WhatsApp Image 2025-01-26 at 12.20.24.jpeg

WhatsApp Image 2025-01-26 at 13.02.36.jpeg

About Matribhumi Samachar

Check Also

वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित विशेष चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2025. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित …