Friday, January 09 2026 | 11:20:43 AM
Breaking News

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ या पुरस्काराने सन्मानित!

Connect us on:

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळाला (एनटीपीसी ) प्रतिष्ठित ईटी  एज पुरस्कार  2025 (ET Edge Awards 2025) अंतर्गत  काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था या पुरस्काराने गौरवण्यात आले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका अभियानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळाचे कार्यकारी संचालक (मनुष्यबळ) सी. कुमार आणि राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळाचे पश्चिम विभाग-1 च्या प्रादेशिक मनुष्यबळ विभागाच्या प्रमुख वंदना चतुर्वेदी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुस्कारातून राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळाची कर्मचारी केंद्रित संस्कृती जपण्याची आणि आपल्या कर्मचाऱ्यांना सक्षम बनवण्याची वचनबद्धताही अधोरेखित झाली.

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळाबद्दल:
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ लिमिटेडचा उर्जा विषयक कार्यक्षेत्राचा विस्तार प्रचंड व्यापक आणि वैविध्यपूर्ण आहे. याद्वारे ते देशाच्या ऊर्जा पुरवठ्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळाची स्थापना 1975 मध्ये झाली होती. आजमितीला राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळाचे कोळसा, वायू, जलविद्युत, नवीकरणीय आणि अणुऊर्जा विषयक एकूण 76 गिगावॅट पेक्षा जास्त क्षमतेचे प्रकल्प कार्यरत आहेत. राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ हे शाश्वत ऊर्जा वषयक उपाययोजनांच्या बाबतीत वचनबद्धतेने वाटचाल करत असून, स्वच्छ ऊर्जा उपक्रम आणि संबंधित तंत्रज्ञानात आघाडीवर आहे. भविष्यात शून्य कार्बन उत्सर्जनाच्या स्थितीत पोहण्याच्या भारताच्या संकल्पाला अनुसरूनच  राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळाची ही वाटचाल सुरू आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

ॲक्सिस बँकेने वाढत्या डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी ग्राहकांच्या नियंत्रणाखालील सुरक्षा सुविधांसह ‘सेफ्टी सेंटर’ सुरू केले

ग्राहकांना रिअल-टाइममध्ये पूर्णतः नियंत्रित करता येणाऱ्या सुरक्षा सुविधांद्वारे सक्षम करते एसएमएस शिल्ड : बँकेकडून येणाऱ्या …