Wednesday, December 10 2025 | 07:16:52 PM
Breaking News

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने मुंबईत ‘जियो पारसी’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण मोहिमेचे केले आयोजन

Connect us on:

पारशी समुदायाला पाठबळ देण्याच्या आणि त्यांची घटती लोकसंख्या रोखण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणून, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने आज मुंबईत ‘जियो पारसी’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक दिवसीय बायोमेट्रिक प्रमाणीकरण मोहीम आयोजित केली.

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे उपमहासंचालक आलोक कुमार वर्मा आणि मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, यावेळी बॉम्बे पारसी पंचायत आणि महाराष्ट्र सरकारच्या प्रतिनिधींसह, योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला आणि लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला. या कार्यक्रमात लाभार्थ्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला. मुंबईतील 148 नोंदणीकृत लाभार्थ्यांपैकी सुमारे 100 लाभार्थी उपस्थित राहिले आणि त्यांनी आपले अनिवार्य वार्षिक बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण केले.

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या ‘जियो पारसी’ योजनेचे तीन प्रमुख घटक आहेत:

वैद्यकीय साहाय्य  – वंध्यत्वाच्या समस्येवर आयव्हीएफ, आयसीएसआय, सरोगसी यासारख्या उपचारांसाठी आणि गर्भधारणेनंतरची काळजी यासाठी आर्थिक सहाय्य.

समुदायाचे आरोग्य – मुले असलेल्या पारशी जोडप्यांना तसेच अवलंबित्व असलेल्या वयोवृद्ध सदस्यांना मासिक आर्थिक सहाय्य.

जागृती  – या समाजात वेळेवर विवाह, प्रजननाबाबत जागरूकता आणि कौटुंबिक आधार याला  प्रोत्साहन.

या योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी मंत्रालय सक्रियपणे काम करत आहे. आतापर्यंत ‘जियो  पारसी’ योजनेअंतर्गत नावनोंदणीसाठी 138 नवे अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांची सध्या छाननी सुरू असून योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यावर कार्यवाही केली जाईल.

देशातील सर्वात छोट्या  समुदायांपैकी एक असलेल्या या समुदायाचे सांस्कृतिक आणि लोकसंख्याशास्त्रीय सातत्य राखण्यामध्ये ‘जियो पारसी’  योजना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आजची यशस्वी बायोमेट्रिक मोहीम पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि पारशी समुदायाला लाभांचे अखंड वितरण करण्याप्रति सरकारची वचनबद्धता अधोरेखित करते.

About Matribhumi Samachar

Check Also

संचार लेखा नियंत्रक कार्यालयात पणजी येथे पेन्शन अदालतचे आयोजन

पणजी, 9 ऑक्टोबर 2025. संचार लेखा नियंत्रक (सीसीए), महाराष्ट्र आणि गोवा कार्यालयाने आज 9 डिसेंबर …