Sunday, December 07 2025 | 05:52:49 AM
Breaking News

एक अत्यंत शुभ चिन्ह, देवभूमी उत्तराखंडाने समान नागरी संहितेला प्रत्यक्षात साकार केले आहे – उपराष्ट्रपती

Connect us on:

नवी दिल्‍ली, 27 जानेवारी 2025. आजचा दिवस अत्यंत शुभ असून उत्तराखंड राज्याने आज समान नागरी संहिता (युसीसी) प्रत्यक्षात लागू केली आहे अशा शब्दात उप-राष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला आहे.

धनखड यांनी आज राज्यसभा अंतर्वासिता कार्यक्रमातील सहभागींच्या पाचव्या तुकडीसाठी उपराष्ट्रपती एन्क्लेव्ह येथे आयोजित उद्घाटनपर कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले तसेच त्यांनी या अंतर्वासिता कार्यक्रमासाठी सुरु करण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन देखील केले.

यावेळी राज्यसभा अंतर्वासिता कार्यक्रमातील सहभागींना संबोधित करताना उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, “आज एक अत्यंत शुभ चिन्ह ठरणारी घटना घडली आहे. आणि ते शुभ चिन्ह म्हणजे संविधान कर्त्यांनी संकल्पित केलेले आणि संविधानात निर्देशित केलेले, विशेषतः चौथ्या भागात – राज्यविषयक धोरणाबाबतची दिशादर्शक तत्वे- या भागात अंतर्भूत केलेले विषय. ही दिशादर्शक तत्वे वास्तवात साकार करण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करण्याचे निर्देश संविधान कर्त्यांनी राज्यांना दिले. त्यापैकी काही बाबी प्रत्यक्षात उतरवण्यात यश आले, मात्र कलम 44 प्रत्यक्षात साकार होणे ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. भारतीय संविधानातील 44 वे कलम असा नियम सांगते आणि आदेश देते की संपूर्ण भारतभरातील नागरिकांसाठी समान नागरी संहिता लागू करण्यासाठी राज्ये प्रयत्न करतील. आपण सर्वजण आज अत्यंत आनंदी झालो आहोत. भारतीय संविधानाचा स्वीकार झाल्यानंतर आता देवभूमी उत्तराखंडने समान नागरी संहिता वास्तवात साकार केली आहे. देशातील एका राज्याने हे करून दाखवले आहे. उत्तराखंड सरकारने त्यांच्या राज्यात समान नागरी संहिता लागू करून संविधान कर्त्यांची  संकल्पना वास्तवात आणण्यासाठी दाखवलेल्या दूरदृष्टीबद्दल मी या सरकारचे अभिनंदन करतो आणि मला खात्री आहे की येत्या काही काळातच संपूर्ण देश अशा प्रकारच्या कायद्याचा स्वीकार करेल.”

युसीसीला काही लोकांकडून होणाऱ्या विरोधाबाबत चिंता व्यक्त करत उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, “काही जण केवळ निष्काळजीपणामुळे यावर टीका करत आहेत. भारतीय संविधानाने निर्देशित केलेल्या एखाद्या गोष्टीवर आपण टीका कशी काय करू शकतो?  आपल्या संस्थापक जनकांकडून आलेला आदेश आहे तो. लिंग समानता प्रस्थापित करण्यासाठी केला जाणारा हा प्रयत्न आहे, त्याला आपण विरोध का करायचा? राजकारणाची पाळेमुळे आपल्या मनांमध्ये इतकी खोलवर रुजलेली आहेत की आता त्यातून विष निर्माण झाले आहे. राजकीय लाभासाठी लोक राष्ट्रवाद देखील सोडून द्यायला मागेपुढे पहात नाहीत, क्षणभर देखील त्याबद्दल चिंता न बाळगत नाहीत. समान नागरी संहितेच्या घोषणेला कोणीही विरोध कसे करू शकतो! तुम्ही त्याचा अभ्यास करा.संसदेत त्याबद्दल झालेल्या चर्चा अभ्यासा, अशी संहिता लागू करण्यासाठी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने किती वेळा सूचित केले आहे  ते देखील पहा.”

अवैध स्थलांतरीतांमुळे देशाच्या सुरक्षिततेला निर्माण होत असलेला धोका अधोरेखित करत उपराष्ट्रपती धनखड यांनी या संदर्भातील आव्हानांकडे लक्ष पुरवण्यावर अधिक भर देण्याची सूचना केली.

“भारत हा जगातील असा एकमेव देश ठरला आहे ज्याने गेल्या दशकभरात प्रचंड आर्थिक झेप, पायाभूत सुविधांचा जलदगती विकास, तंत्रज्ञानाची खोलवर पोहोच, तरुणांसाठी अत्यंत अनुकूल ठरणारी सहयोगात्मक धोरणे विकसित करून दाखवली आहेत आणि त्यातून आशा आणि शक्यतांचे वातावरण निर्माण झाले आहे,” उपराष्ट्रपती धनखड पुढे म्हणाले.

About Matribhumi Samachar

Check Also

नागपुरात जागतिक मृदा दिनी सेंद्रीय शेती संदर्भात प्रादेशिक सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती केंद्र तसेच एनडीआरएफ अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

नागपूर 5 डिसेंबर 2025 मृदेचे आरोग्य आपण जर व्यवस्थित राखले , रसायनाचा उपयोग न करता  कचऱ्यापासून …