पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे अध्यक्ष एम्मान्युएल मॅक्राँ आणि आयर्लंडचे पंतप्रधान मायकेल मार्टिन यांचे भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानले.
फ्रान्सच्या अध्यक्षांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टला प्रतिसाद देताना मोदी म्हणालेः
“माझे प्रिय मित्र, अध्यक्ष @EmmanuelMacron तुम्ही भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी दिलेल्या शुभेच्छा अतिशय प्रशंसनीय आहेत. गेल्या वर्षी या दिनानिमित्त तुमची आदरणीय उपस्थिती, हा दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी आणि घनिष्ठ मैत्रीचा खरोखरच परमोच्च बिंदू होता. मानवतेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण काम करत आहोत, त्यामुळे पॅरिसमधील एआय ऍक्शन समिटच्या वेळी लवकरच आपण भेटूया.”
आयर्लंडच्या पंतप्रधानांनी एक्सवर केलेल्या पोस्टला प्रतिसाद देताना मोदी म्हणाले:
“पंतप्रधान @MichealMartinTD तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल तुमचे आभार. लोकशाहीवरील विश्वास आणि निष्ठेच्या सामाईक भावनेवर आधारित भारत आणि आयर्लंड यांच्यातील घनिष्ठ मैत्री यापुढच्या काळात उत्तरोत्तर बळकट होत जाईल, असा मला विश्वास आहे.”
Matribhumi Samachar Marathi

