नवी दिल्ली, 27 जानेवारी 2025. जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल अभियान (एनडब्ल्यूएम) अंतर्गत जल वापर कार्यक्षमता ब्युरो (बीडब्ल्यूयूई)ने इंडियन प्लंबिंग असोसिएशन (आयपीए) च्या सहकार्याने, घरगुती पाणी वापर क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. या संदर्भात “पाण्याचा काटेकोर वापर: शाश्वत भविष्यासाठी धोरण” या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले. ही कार्यशाळा नवी दिल्लीतील संसद मार्गावरील पालिका केंद्राच्या एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती.

या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय जल शक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी केले. नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि सहयोगी प्रयत्नांद्वारे जलसंवर्धनासाठी सरकारची वचनबद्धता अधोरेखित केली. कार्यशाळेने विविध मंत्रालये, संघटना, धोरणकर्ते, उद्योग नेते, तज्ञ आणि भागधारकांना एकत्र आणून घरगुती क्षेत्रात पाणी वापर कार्यक्षमता वाढविण्यासाठी धोरण आणि तांत्रिक प्रगतीवर चर्चा केली.
कार्यशाळेदरम्यान पाण्याचा वापर कमी केला जावा, यासाठी कमी प्रवाह असलेले नळांचे ‘फिक्श्चर आणि स्मार्ट सॅनिटरी वेअर सोल्यूशन्सची महत्त्वाची भूमिका देखील अधोरेखित करण्यात आली. या कार्यशाळेत संबंधित मंत्रालये, जल क्षेत्रातील विविध उद्योग, जल व्यवस्थापन स्वयंसेवी संस्था आणि इतर भागधारकांचे प्रतिनिधित्व करणारे 350 पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित होते. याव्यतिरिक्त, 20 पेक्षा जास्त तज्ञ/वक्त्यांनी अभ्यासपूर्ण सादरीकरणे दिली आणि कार्यक्रमादरम्यान झालेल्या चर्चेत योगदान दिले.

याचबरोबर जलशक्ती मंत्री आणि विविध प्रमुख उद्योगांमधील प्रतिष्ठित पाहुण्यांसोबत संवाद साधण्याचे नियोजन केले होते. उद्योगांनी त्यांच्या डिझाइन आणि उत्पादनांमध्ये जल-कार्यक्षम तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि त्यांचे अनुभव, कल्पना आणि आव्हाने सामायिक करावीत, ज्यामुळे देशांतर्गत क्षेत्रात जल व्यवस्थापनासाठी सहयोगी दृष्टिकोन वाढेल, असे या कार्यशाळेत सांगण्यात आले.
कार्यशाळेमध्ये मान्यवर वक्त्यांनी शाश्वत पद्धती, जल व्यवस्थापनातील प्रगत तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले, जल व्यवस्थापनासाठी सहयोगी दृष्टिकोन स्वीकारला गेला तर पडणारा प्रभाव, स्पष्ट करणारी उदाहरणे सामायिक करण्यात आली. तसेच यशस्वी जल व्यवस्थापन मॉडेल्सची वास्तविक-जगातील उदाहरणे प्रदर्शित केली. या कार्यशाळेमध्ये एक संवादात्मक सत्र घेण्यात आले. त्यामध्ये जलशक्ती मंत्री पाटील यांनी विविध जल उद्योगांमधील प्रतिष्ठित पाहुण्यांशी संवाद साधला.

कार्यशाळेत यावर भर देण्यात आलेले विषय:
- जल कार्यक्षम उत्पादने विकसित करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन उद्योगांना प्रोत्साहन देण्यात यावे.
- घरांमध्ये पाणी वाया जावू नये यासाठी कमी-प्रवाह फिक्शचर आणि स्मार्ट सॅनिटरी वेअरचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे.
- सर्व क्षेत्रांमध्ये सहयोगी जल व्यवस्थापन मॉडेल्स वाढवणे.
- पाण्याचा कार्यक्षमतेने वापर करण्यासंबंधी उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी धोरणे मजबूत करणे.
Matribhumi Samachar Marathi

