Tuesday, December 09 2025 | 03:24:10 AM
Breaking News

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने युवा सहभाग आणि अनुभव वाढविण्यासाठी ‘माय भारत’ पोर्टलसह व्हाट्सअप चॅटबॉट एकत्रीकरण केले सुरू

Connect us on:

नवी दिल्‍ली, 27 जून 2025

भारतातील तरुणांचा डिजिटल सहभाग वाढविण्यासाठी आणि सेवांमध्ये सुलभता आणण्यासाठी एक प्रगतीशील पाऊल म्हणून, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने MY Bharat पोर्टल (https://mybharat.gov.in) सोबत WhatsApp एकत्रीकरण सुरू केले आहे.

व्हॉट्सअॅप चॅटबॉट आता माय भारत पोर्टलवर लाइव्ह आहे आणि व्हॉट्सअॅप (7289001515) द्वारे थेट उपलब्ध आहे. यामुळे वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मशी संवाद साधण्याचा अधिक अखंड, रिअल-टाइम आणि वापरकर्ता-अनुकूल मार्ग मिळतो. या प्रसिद्धीपत्रकात सर्व नोंदणीकृत ‘माय भारत’ वापरकर्त्यांसाठी मुख्य वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. यामुळे त्यांना अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रम, स्वयंसेवा संधी, सीव्ही निर्मिती, मार्गदर्शन, संस्था /संघटनेत सामील होणे/निर्मिती, कोणत्याही समस्यांची तक्रार करणे आणि माय भारत सपोर्ट सेवा वापरण्याची परवानगी मिळते.

व्हॉट्सअॅप चॅटबॉटमध्ये सेशन सुरू करण्यासाठी, व्यक्तीला 7289001515 या क्रमांकावर ‘Hi’ असा संदेश पाठवावा लागेल. वैयक्तिक लॉगिन ओळख ओटीपीद्वारे ओळखले जाईल आणि पुढील सेवांसाठी सत्र सुरू केले जाईल.

आगामी प्रसिद्धीपत्रकांमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये सादर केली जातील जसे की अॅपमधील नोंदणी, डाउनलोडसह सूचना, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मीडिया अपलोड, रिमाइंडर आणि पाठपुरावा, प्रोफाइल / टास्क कंपलिशन इत्यादी.

व्यवहारविषयक  सेवांव्यतिरिक्त, चॅटबॉटचा वापर ऑटोमेटेड रिमाइंडर पाठवण्यासाठी, प्रमाणपत्रे वितरित करण्यासाठी, इतर दस्तऐवजांसाठी आणि अनुपालन सूचना सामायिक करण्यासाठी केला जाऊ शकतो. हे पोर्टल तरुणांना माहिती देण्यासाठी आणि सक्रियपणे सहभागी करून घेण्यासाठी सरकारी मोहिमांची सामग्री, कार्यक्रमांचे ठळक मुद्दे, सरकारी योजनांवरील अद्यतने, सर्वोत्तम पद्धती आणि टूल किट देखील प्रसारित करेल.

तरुणांसाठी महत्त्वाचे फायदे:

  • व्हाट्सअॅपद्वारे माय भारत सेवा सोयीस्कररित्या हातळण्याची सुविधा
  • जलद ऑनबोर्डिंग, कार्यक्रम सहभाग आणि अप्लिकेशन  ट्रॅकिंग
  • रिअल-टाइम अपडेट्स आणि रिमाइंडर्स
  • समस्यांची सोपी नोंद आणि निवारण सहकार्य
  • संधी, योजना आणि सर्वोत्तम पद्धतींबद्दल नियमित प्रसारणाच्या माध्यमाने माहिती
  • राष्ट्रीय कार्यक्रमांशी जोडलेले राहण्यासाठी एक परिचित, मोबाइल-फर्स्ट इंटरफेस

हे एकत्रीकरण युवकांना सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये सार्वजनिक सेवांचा समावेश करून सक्षमीकरण करण्याच्या मंत्रालयाच्या वचनबद्धतेला बळकटी देते, जेणेकरून तरुणांना कायम जोडलेले आणि माहितीयुक्त ठेवणे शक्य होते.

माय भारत हे एक तंत्रज्ञान व्यासपीठ आहे जे युवा व्यवहार विभाग (DoYA) द्वारे डिझाइन केलेले आहे आणि डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन (DIC) MeitY भारत सरकार द्वारे विकसित केले आहे. या माध्यमाने देशातील युवा शक्तीच्या सहभागासाठी एक संस्थात्मक पद्धत लागू केली जाऊ शकेल.

‘सेवाभाव’ आणि ‘कर्तव्य बोध’ या भारतीय नीतिमत्तेसह तरुणांना सक्षम बनवण्याच्या मुख्य उद्देशाने, हे व्यासपीठ विविध स्वयंसेवा आणि शिक्षण उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी, तज्ञांकडून मार्गदर्शन मिळविण्यासाठी, युवा प्रोफाइल आणि सीव्ही तयार करण्यासाठी, इतर तरुणांशी संपर्क साधण्यासाठी आणि इतर उल्लेखनीय क्षमता निर्माण उपक्रमांसाठी पर्याय प्रदान करते.

About Matribhumi Samachar

Check Also

वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित विशेष चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2025. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित …