Monday, December 29 2025 | 05:03:28 AM
Breaking News

15 वी निवृत्तीवेतन अदालत नवी दिल्लीतील आयआयपीए (IIPA) इथे संपन्न; 1087 प्रलंबित निवृत्तीवेतन तक्रारींचे निवारण

Connect us on:

नवी दिल्‍ली, 27 डिसेंबर 2025. नवी दिल्ली इथल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (IIPA) मध्ये 24 डिसेंबर 2025 रोजी 15 वी निवृत्तीवेतन अदालत पार पडली. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या सचिव रचना शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही अदालत आयोजित करण्यात आली होती.

या निवृत्तीवेतन अदालतीमध्ये संरक्षण, गृह, वित्त, टपाल, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार, नागरी विमान वाहतूक अशा विविध 30 मंत्रालय/विभागांशी संबंधित निवृत्तीवेतनधारकांच्या 1087 प्रलंबित तक्रारी निवारणासाठी घेण्यात आल्या. त्यापैकी 815 तक्रारींचे जागेवरच निवारण करण्यात आले. यातून निवृत्तीवेतनधारकांना वेळेवर न्याय देण्याच्या या उपक्रमाची कार्यक्षमता अधोरेखित होते.

‘जन संवाद’ मधील काही निवडक यशोगाथा या अदालतीमध्ये अनेक हृदयस्पर्शी यशोगाथा समोर आल्या. त्यातून निवृत्तीवेतनधारकांचा संघर्ष आणि निवृत्तीवेतन अदालत यंत्रणेने त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यात केलेली मदत दिसून येते:

सत्यम मिश्रा (प्रयागराज)

  • तक्रार: जुलै 2024 पासून ‘असाधारण निवृत्तीवेतन’ लाभ न मिळणे.
  • प्रलंबित काळ: 114 दिवसांहून अधिक.
  • निकाल: बीएसएफ (BSF) अधिकार्‍यांनी माहिती दिली की, प्रकरणाची पूर्तता झाली असून ₹5,73,728/- (सानुग्रह अनुदानासह) थकबाकी अदा करण्यात आली आहे. त्यांचे नियमित निवृत्तीवेतन 01.12.2025 पासून सुरू होईल.

दलजीत सिंह (रेवाडी, हरियाणा)

  • तक्रार: प्रवास भत्ता न मिळणे आणि अपंगत्व संबंधित लाभांची तपासणी.
  • प्रलंबित काळ: 150 दिवसांहून अधिक.
  • निकाल: पीसीडीए (निवृत्तीवेतन), प्रयागराज यांनी कळवले की, ₹12,02,656/- प्रवास भत्ता 10.11.2025 रोजी त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.

नसीम अख्तर (श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर)

  • तक्रार: ऑगस्ट 2020 पासून प्रलंबित असलेल्या कौटुंबिक निवृत्तीवेतन प्रकरणाचा निपटारा.
  • प्रलंबित काळ: 150 दिवसांहून अधिक.
  • निकाल: हे प्रकरण जनगणनेच्या कामकाजाशी संबंधित होते. अधिकार्‍यांनी कळवले की, 24.12.2025 रोजी प्राधिकृत पत्र जारी करण्यात आले असून लवकरच थकबाकी दिली जाईल.

कांचन बाला (उना, हिमाचल प्रदेश)

  • तक्रार: जानेवारी 2021 पासून अविवाहित मुलीला कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळण्यास विलंब. तिचे वडील दिवंगत चुर सिंग बीएसएफमध्ये कार्यरत होते.
  • निकाल: बीएसएफ अधिकार्‍यांनी सांगितले की, प्रकरणाची प्रक्रिया सुरू असून 10 दिवसांच्या आत त्याचे पुनरावलोकन करून निवारण केले जाईल.

मुक्ता चक्रवर्ती (गुवाहाटी, आसाम)

  • तक्रार: ऑक्टोबर 2020 पासून अविवाहित मुलीला कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळण्याबाबत प्रलंबित प्रकरण.
  • निकाल: मे 2023 मध्ये दावा दाखल करूनही आणि केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली वर तक्रार नोंदवूनही प्रकरण सुटले नव्हते. आता केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ आणि केंद्रीय निवृत्तीवेतन लेखा कार्यालय, यांना 10 दिवसांत प्रकरणाचा आढावा घेऊन त्वरित निवारण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मणिका दास (दार्जिलिंग, पश्चिम बंगाल)

  • तक्रार: जून 2017 ते सप्टेंबर 2024 या कालावधीतील उर्वरित 50% कौटुंबिक निवृत्तीवेतन थकबाकी न मिळणे.
  • प्रलंबित काळ: 229 दिवसांहून अधिक.
  • निकाल: संरक्षण मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी कळवले की, ₹18 लाख थकबाकी लवकरच जमा केली जाईल आणि त्यांचे निवृत्तीवेतन 31.12.2025 पासून सुरू होईल.

नसीम अख्तर

जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरचे रहिवासी असलेले नसीम अख्तर, यांची तक्रार 150 दिवसांपेक्षा अधिक काळापासून प्रलंबित होती. ऑगस्ट 2020 पासून प्रलंबित असलेल्या कौटुंबिक निवृत्ती वेतन प्रकरणाच्या निपटाऱ्यासाठी झालेल्या विलंबाबाबत त्यांची तक्रार होती. त्यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत (VC) अदालतीमध्ये भाग घेतला. हे प्रकरण जनगणना संचालनालयाशी संबंधित होते. केंद्रीय निवृत्तीवेतन लेखा कार्यालयाचे (सीपीएओ) मुख्य कंट्रोलर यांनी माहिती दिली की, प्राधिकारपत्र 24.12.02 रोजी जारी करण्यात आले आहे आणि कोणत्याही पुढील विलंबाशिवाय थकबाकी देखील दिली जाईल.

कांचन बाला

कांचन बाला या हिमाचल प्रदेशातील रहिवासी आहेत आणि त्यांची तक्रार 150 दिवसांपेक्षा अधिक काळापासून प्रलंबित होती. त्यांचे प्रकरण जानेवारी 2021 पासून अविवाहित मुलीला कौटुंबिक निवृत्ती वेतन मंजूर करण्यास विलंब झाल्याबद्दल होते. त्यांचे वडील दिवंगत चुर सिंग सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. कांचन बाला यांनी स्वतः दूरदृश्य प्रणालीमार्फत अदालतीमध्ये सहभाग झाल्या होत्या आणि त्यांनी आपल्या आर्थिक अडचणी मांडल्या. त्यांचे प्रकरण प्रक्रियाधीन आहे आणि दहा दिवसांच्या आत त्याचे पुनरावलोकन करून निराकरण केले जाईल, असे सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी अदालती मध्ये सांगितले.

मुक्ता चक्रवर्ती

आसाम मधल्या गुवाहाटी येथील रहिवासी असलेल्या मुक्ता चक्रवर्ती यांची तक्रार 150 दिवसांपेक्षा जास्त काळापासून प्रलंबित होती. त्यांची तक्रार  दिवंगत रजत भूषण चक्रवर्ती यांच्या अविवाहित मुलीला कौटुंबिक निवृत्ती वेतन मंजूर करण्यासंदर्भात होती. त्यांची तक्रार ऑक्टोबर 2020 पासून प्रलंबित आहे. त्या देखील दूरदृश्य प्रणालीमार्फत अदालतीमध्ये सामील झाल्या होत्या. दिनांक 12.05.2023 रोजी दावा सादर करून आणि CPGRAMS वर तक्रार दाखल करूनही हे प्रकरण अनिर्णित राहिले. पीएओ-सीबीडीटी आणि सीपीएओ या दोघांनाही दहा दिवसांत प्रकरणाचे पुनरावलोकन करण्याची आणि लवकर निराकरणासाठी पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात आली आहे.

मनिका दास

मनिका दास या पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे राहतात. त्यांची तक्रार 299 दिवसांपेक्षा जास्त काळापासून प्रलंबित होती. त्यांची तक्रार 30.06.2017 ते सप्टेंबर 2024 या कालावधीसाठी उर्वरित 50% कौटुंबिक निवृत्ती वेतनाची थकबाकी न मिळाल्याबद्दल होती. त्यांचा मुलगा दूरदृश्य प्रणालीमार्फत अदालतीमध्ये सामील झाला होता. , 18 लाख रुपयांची थकबाकी लवकरच जमा केली जाईल आणि 31.12.2025 पासून त्यांचे निवृत्तीवेतन सुरू केले जाईल, अशी माहिती सीजीडीए आणि पीसीडीए (पेंशन), प्रयागराज, संरक्षण मंत्रालय यांनी अदालतीत दिली.

About Matribhumi Samachar

Check Also

प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्रवासी सहाय्यता नियंत्रण कक्ष (PACR) केला स्थापन

नवी दिल्‍ली, 28 डिसेंबर 2025. भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राने गेल्या दशकात, विशेषतः गेल्या अकरा वर्षांत, अभूतपूर्व …