नवी दिल्ली, 28 जानेवारी 2025. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज ‘पंजाब केसरी’ लाला लजपतराय यांच्या जयंतीनिमित्त संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, संसद सदस्य, माजी सदस्य, लोकसभेचे सरचिटणीस उत्पल कुमार सिंह, आणि इतर मान्यवरांनीही यावेळी पुष्पहार अर्पण करून लाला लजपतराय यांना आदरांजली वाहिली.
लोकसभा सचिवालयातर्फे हिंदी व इंग्रजीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली लाला लजपतराय यांच्या जीवनावरील पुस्तिका मान्यवरांना प्रदान करण्यात आली.
17 नोव्हेंबर 1956 रोजी संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते लाला लजपतराय यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले होते.
Matribhumi Samachar Marathi

