नवी दिल्ली, 28 जानेवारी 2025. प्रयागराज येथील महाकुंभ 2025 मध्ये भारत सरकारच्या उपक्रमांद्वारे ‘विविधतेमधील एकता’ यावर प्रकाश टाकणाऱ्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या डिजिटल प्रदर्शनाकडे मोठ्या संख्येने लोक आकर्षित होत आहे.

‘एक राष्ट्र, एक कर’, ‘एक राष्ट्र, एक पॉवर ग्रिड’, आणि ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’ इत्यादी भारत सरकारच्या उपक्रमांद्वारे “ऐक्यं बलं सामंजस्य” (विविधतेत एकता) हे वाक्य साकारले जात आहे. प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्यातील त्रिवेणी मार्गावर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आयोजित केलेल्या डिजिटल प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना देशाची एकता मजबूत करणाऱ्या या उपक्रमांबद्दल माहिती दिली जात आहे. एकतेचा संदेश देणाऱ्या एका चित्रात राष्ट्रीय एकतेचे प्रतीक सरदार पटेल यांचा पुतळा देखील दाखवण्यात आला आहे.

जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 वे रद्द झाल्यानंतर, ‘एक राष्ट्र, एक राज्यघटना’ ही प्रतिज्ञा पूर्ण झाली आहे. ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ आणि ‘एक राष्ट्र, एक नागरी संहिता’ या दिशेने केलेले प्रयत्न विकसित भारताच्या स्वप्नाच्या पूर्ततेला गती देत आहेत, जे प्रदर्शनात आकर्षक स्वरूपात सादर करण्यात आले आहे.
लोककल्याणकारी कार्यक्रम, धोरणे आणि भारत सरकारच्या कामगिरीवर आधारित हे प्रदर्शन उद्योजकता आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांवर भर देणारे आहे. तसेच मुद्रा योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, पीएमईजीपी आणि पत हमी निधी योजना योजना यासारख्या विविध योजनांमुळे लहान- लहान व्यावसायिकांना मदत होत असल्याचे प्रदर्शनाव्दारे सांगितले आहे.

या प्रदर्शनाला 13 जानेवारी रोजी प्रारंभ झाला. कुंभमेळ्याला येणारे भाविक मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देत आहेत. त्यांना दृकश्राव्य माध्यमातून विकास आणि वारशाची माहिती देण्यात येत आहे. विविध सरकारी योजनांचे प्रदर्शन करणारे एलईडी भिंतीवर लावले असून, दाखवले जाणारे माहितीपट पर्यटकांना आकर्षित करत आहेत. अनेकजण प्रदर्शनामध्ये सेल्फीही काढत आहेत.
Matribhumi Samachar Marathi

