मुंबई, 28 नोव्हेंबर, 2025
मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्राच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त आज “मजेदार विज्ञान” या परस्पर संवादी दालनाचे उद्घाटन करण्यात आले. या दालनाची निर्मिती विद्यार्थ्यांना आणि अभ्यागतांना विज्ञानातील शोधाचा आनंद घेता यावा, यासाठी केली आहे.

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय अंतर्गत सर्वात मोठे विज्ञान केंद्र असलेल्या नेहरू विज्ञान केंद्राचे उद्घाटन 11 नोव्हेंबर, 1985 रोजी झाले होते. या केंद्राचे उद्घाटन माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी केले होते.
“मजेदार विज्ञान” परस्पर संवादी दालनाचे उद्घाटन मुंबईतील कुलाबा येथील टाटा मुलभूत संशोधन संस्थेचे संचालक प्रा. जयराम एन. चेंगलूर यांनी केले. याप्रसंगी नेहरू विज्ञान केंद्राचे संचालक उमेश कुमार आणि 300 हून अधिक शालेय विद्यार्थी आणि अभ्यागत उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना, प्रा. जयराम एन. चेंगलुर यांनी अनुभवात्मक विज्ञान शिक्षणाचे मूल्य अधोरेखित केले. ज्यावेळी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी आणि गोष्टी कशा कार्य करतात याचा शोध घेण्यास तसेच प्रत्यक्ष संवादातून संकल्पना अनुभवण्यास प्रोत्साहित केले जाते, त्यावेळी विज्ञान अधिक चांगल्या प्रकारे समजते; यावर त्यांनी भर दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना नेहरू विज्ञान केंद्राला वारंवार भेट देण्याचे आणि विज्ञानातील शोधाच्या आनंददायी प्रवासामध्ये रूपांतरित करणाऱ्या इथल्या शैक्षणिक वातावरणाचा पुरेपूर फायदा घेण्याचे आवाहन केले.
मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्राचे संचालक उमेश कुमार यांनी नव्याने सुरू झालेल्या दालनाविषयी आणि तेथील प्रदर्शनांबद्दल माहिती दिली. त्यांनी केंद्राच्या ‘केआयएसएमआयएफ’ च्या मार्गदर्शक तत्वज्ञानाचा पुनरुच्चार केला. यावेळी ते म्हणाले, “कीप इट सिंपल, मेक इट फन”, ज्याचा उद्देश तरुण मनांसाठी जटिल तत्त्वे सुलभ करताना कुतूहल जागृत करणे आहे.
मजेदार विज्ञान: जिथे कुतूहल, उत्सुकतेचा खेळ असतो-
वैज्ञानिक कल्पनांना आनंददायी, संस्मरणीय अनुभवांमध्ये रूपांतरित करण्यासाठी डिझाइन केलेले दालन अभ्यागतांचे स्वागत करण्यासाठी, आणि नवीन शोधांची माहिती देण्यासाठी आमंत्रित करते.
तीन विभागांमध्ये प्रदर्शनांचे गट बनवले आहेत:
विभाग-1 : भौतिकशास्त्राचे जग
बल, गती आणि दृश्य रहस्ये डीकोड करणारे आकर्षक मांडणी:
• पाण्याच्या जादुई नळ – एक तरंगणारा नळ, तो भ्रम निर्माण करतो आणि निरंतर पाणी चालू आहे असे भासवतो.
• ‘गायरो टर्न’ – कोनीय संवेगाचे संवर्धन अनुभवावे.
• बुडणारे जहाज – बुडबुडे पाण्याची घनता कशी बदलू शकतात ते जाणून घेणे.
– ‘मॅग्नस’ प्रभाव – खेळांमध्ये फिरणाऱ्या वस्तू कशा वक्र होतात हे समजून घेणे.
• एडी करंट एग – चुंबकीय शक्तींचा वापर न करता संपर्क न करता धातूच्या अंड्याच्या फिरण्याकडे पाहणे.
विभाग-2 : डिजिटल युग
वास्तविक आणि डिजिटल जगाचे मिश्रण करणाऱ्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाची खेळत माहिती घेणे :
• पूरक वास्तव – तुमच्या हालचालींना प्रतिसाद देणाऱ्या डिजिटल वातावरणात प्रवेश करणे.
टोपोग्राफिकल 3D मॅपिंग – लँडस्केप्सची शिल्पे तयार करणे आणि रिअल-टाइम उंचीचे रंग पाहणे.
पार्श्वगायनासाठी गुणगुणणे – एक गाणे गुणगुणणे आणि कृत्रिम प्रज्ञेला ते त्वरित ओळखू देवून आणि ऐकवू देता येईल.
• ‘पाय’ मध्ये वाढदिवस – ‘पाय’ च्या दशलक्ष अंकांमध्ये लपलेली जन्मतारीख शोधणे.
विभाग 3 : शरीर आणि मन यांना आव्हान
शारीरिक चपळता आणि संज्ञानात्मक प्रतिक्षेपांची चाचणी घेणारे परस्परसंवादी प्रदर्शन:
• तुम्ही किती वेगवान आहात – हात-डोळा समन्वय मोजणारी प्रतिक्रियाशील प्रकाश भिंत.
• लॅबिरिंथ क्लाइंबर – संतुलन आणि सहनशक्तीला आव्हान देण्यासाठी एक उभा भूलभुलैया.
• स्नायू शक्ती – डिजिटल फोर्स मीटरद्वारे तुमची शक्ती मोजा.
• बास्केटबॉल आव्हान – परिपूर्ण शूटिंग आर्कचे भौतिकशास्त्र जाणून घ्या.
Matribhumi Samachar Marathi

