Saturday, January 03 2026 | 09:28:23 AM
Breaking News

राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्‍ये भारत बालवीर आणि वीरबाला हीरक महोत्सवी समारंभाचा समारोप

Connect us on:

राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्‍ये आज (28 नोव्हेंबर,  2025) उत्तर प्रदेशातील लखनौ येथे भारत स्काउट्स आणि  गाइडस् म्हणजेच भारत बालवीर आणि वीरबाला   संघटनेचा  हीरक महोत्सवी समारंभाचा  समारोप  झाला. यावेळी  त्यांनी 19  व्या राष्ट्रीय ‘जंबोरी’ ला  मार्गदर्शन  केले.

याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, गेल्या 75 वर्षांपासून भारत स्काउट्स आणि गाइडस् युवावर्गातील मुला- मुलींना  मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांना राष्ट्र उभारणीत सक्रिय सहभागी होण्यासाठी प्रेरणा देत आहे,  ही अभिमानाची बाब आहे. सेवेची भावना ही बालवीर  आणि वीरबालांची  सर्वात मोठी ताकद आहे,  असे त्यांनी अधोरेखित केले. पूर असो, भूकंप असो किंवा साथ रोग असो, बालवीर  आणि वीरबाला  नेहमीच मदतीसाठी अग्रेसर असतात. या संघटनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे,  राष्ट्रीय एकतेला प्रोत्साहन दिले जाते. तरुणांना सक्षम, संवेदनशील आणि देशाच्या भविष्यासाठी काम करण्यासाठी वचनबद्ध बनवल्याबद्दल राष्‍ट्रपती मुर्मू यांनी  भारत बालवीर  आणि वीरबालांचे  कौतुक केले.

याप्रसंगी राष्ट्रपतींनी नमूद केले की, भारतात 63 लाखांहून अधिक बालवीर  आणि वीरबाला आहेत, त्यामुळे  ही जगातील सर्वात मोठी संघटना बनते. या संघटनेशी 24 लाखांहून अधिक कन्या  जोडल्या गेल्या आहेत,  याबद्दल  त्यांनी  आनंद व्यक्त केला. शिस्त, समर्पण,  समाजाचे कल्याण आणि  मानवता  यांचा  मार्ग निवडल्याबद्दल त्यांनी  सर्व मुलींचे कौतुक केले.

राष्ट्रपतींनी सांगितले की, भारत बालवीर आणि वीरबालाचे ब्रीदवाक्य “तयार राहा” आहे. याचा अर्थ असा आहे की,  भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी एखाद्याने सज्ज असले पाहिजे. त्यांनी बालवीर आणि वीरबालांना  कोणत्याही आव्हानाला न डगमगता, दृढनिश्चयाने आणि आत्मविश्वासाने तोंड देण्याची क्षमता विकसित करण्याचा सल्ला दिला. तांत्रिक कौशल्य असो, संवाद कौशल्य असो, सांघिक  समन्वय असो, समस्या सोडवण्याचे कौशल्य असो किंवा नेतृत्व क्षमता विकसित करायची  असो, अशी सर्व कौशल्य त्यांना आपल्या  जीवनात उपयुक्तच ठरतील.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या  की, राष्ट्राचे तरुण हे या देशाच्या भविष्याचे शिल्पकार आहेत. त्याचबरोबर आपल्या महान सांस्कृतिक परंपरांचे रक्षक आहेत. ज्याप्रमाणे  एका दिव्याने  इतर अनेक दिवे प्रज्वलित करता येतात, त्याचप्रमाणे  एक मजबूत आणि संवेदनशील व्यक्ती अनेकांना सक्षम आणि संवेदनशील बनवू शकते.  आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी तरुण स्वतःला झोकून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

About Matribhumi Samachar

Check Also

आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडियातर्फे छत्रपती संभाजीनगर येथे जैवविविधता उद्यानाचे उद्घाटन

या उपक्रमांतर्गत स्थानिक प्रजातींची मोठ्या प्रमाणावर लागवड, फुलपाखरू उद्यान आणि औषधी वनस्पतींची बाग, सौरऊर्जेवर चालणारे …