Wednesday, December 24 2025 | 11:24:43 AM
Breaking News

निलंगा बस स्थानकामध्ये केंद्र शासनाच्या 11 वर्षातील विकासकामांवर दोन दिवसीय मल्टिमीडिया प्रदर्शनाचे आयोजन

Connect us on:

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या वतीने केंद्र शासनाच्या 11 वर्षपूर्ती निमित दिनांक 30 ते 31 जुलै 2025 पर्यंत केंद्र शासनाचे 11 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण योजनांवर बस स्थानक निलंगा येथे दोन दिवसीय डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

हे प्रदर्शन सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत दोन्ही दिवस सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने माघील अकरा वर्षात विविध क्षेत्रात केलेली कामगिरी, देशात जलदगतीने होत असलेली विकासकामे व धोरणांची माहिती यासह विकसित भारताच्या अमृत काळामध्ये घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रम विषयीची माहिती या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली आहे. याशिवाय गरीब, वंचित, आदिवासी, महिला, युवा, शेतकरी, उद्योजक व मध्यमवर्गाच्या विकासासाठी घेण्यात आलेले निर्णय, उज्वला गॅस योजना, डिजिटल इंडिया, पंतप्रधान पीक विमा योजना, किसान सन्मान योजना, आवास योजना, पीएमश्री योजना, मुद्रा योजना, आयुष्मान भारत सारख्या कल्याणकारी योजनांची माहिती, पायाभूत सुविधांमध्ये होत असलेली कामे, देशाची सुरक्षा, परराष्ट्र धोरण इत्यादी विषयांची माहिती चित्र, आकडेवारी, मजकूर तसेच ऑडीओ-व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांना पाहता येणार आहे.

प्रदर्शनाच्या ठिकाणी तहसिल कार्यालय, पंचायत समिती, नगरपरिषद, तालुका कृषी कार्यालय, पोलीस स्टेशन, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, तालुका क्रीडा कार्यालय आदी विभागामार्फत केंद्र व राज्य शासनाच्या राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देणारे दालन उभारण्यात येणार आहे. सोबतच आरोग्य विभागाकडून दोन दिवसीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटनासाठी जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सोलापूर येथील, केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने बस स्थानक निलंगा येथे दोन दिवसांकरिता मल्टिमिडीया चित्र प्रदर्शन भरविणयात येत आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शनातील माहितीवर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेऊन विजेत्यांना ताबडतोब बक्षिसे देखील देण्यात येणार आहे.

केंद्र शासनाने माघील 11 वर्षात घेतलेले निर्णय, धोरणे, उपक्रम आणि विविध कल्याणकारी योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून जास्तीत जास्त नागरीकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार प्रसाद कुलकर्णी यांनी केले आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

केंद्रीय दळणवळण राज्य मंत्री डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी यांनी आधुनिकीकरणाला चालना देण्यासाठी सर्व पोस्टल सर्कलच्या कामगिरीचा घेतला आढावा

नवी दिल्‍ली, 23 डिसेंबर 2025. केंद्रीय दळणवळण आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. पेम्मासानी चंद्र शेखर यांनी …