Sunday, January 25 2026 | 11:06:58 PM
Breaking News

विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत सरकारची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

Connect us on:

संसदेच्या हिवाळी अधिवेशन 2025 संदर्भातील मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी, आज 30 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथील संसद भवन संकुलात,  संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. ही बैठक संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक कार्यमंत्री  किरेन रिजिजू यांनी बोलावली होती. बैठकीस केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच रसायन व खते मंत्री, राज्यसभेतील सभागृहनेते जे पी. नड्डा, कायदा व न्याय (स्वतंत्र प्रभार) आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, तसेच संसदीय कामकाज तथा माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन हे यावेळी उपस्थित होते. विविध मंत्रांसह एकूण 36 राजकीय पक्षांतील 50 नेते या बैठकीस  उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्व उपस्थित नेत्यांचे स्वागत करून बैठकीचे औचित्य  सांगितले. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्र्यांनी बैठकीचे संचालन केले. संसदेचे हिवाळी अधिवेशन 2025  हे सोमवार, 1 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार असून,  शुक्रवार, 19 डिसेंबर 2025 पर्यंत चालेल  होईल, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्र्यांनी  दिली. या अधिवेशन काळात  19 दिवसांच्या कालावधीत एकूण 15 बैठका आयोजित केल्या जाणार आहेत.

या अधिवेशनादरम्यान चर्चेस व मंजुरीसाठी अपेक्षित 14 विधेयके आणि  इतर मुद्द्यांची प्राथमिक यादी तयार करण्यात आली आहे, असे  रिजिजू  यांनी सांगितले.

दोन्ही सभागृहांच्या नियमांनुसार कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार आणि तत्पर आहे, असे संसदीय कामकाज मंत्री रिजिजू यांनी नमूद केले. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आगामी हिवाळी अधिवेशनात त्यांच्या कडून उपस्थित होऊ शकणाऱ्या विविध मुद्द्यांवर आपली मते व्यक्त केली आणि सरकारला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .   बैठकीस उपस्थित राहिल्याबद्दल, आपले विचार आणि मुद्दे मांडल्या बद्दल तसेच  सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल  राजनाथ सिंह आणि  किरेन रिजिजू यांनी  सर्व नेत्यांचे आभार मानले.

About Matribhumi Samachar

Check Also

आयुष निर्यात प्रोत्साहन परिषदेने नवी दिल्ली येथे साजरा केला चौथा स्थापना दिन

भारतीय पारंपरिक औषध प्रणाली आणि आरोग्यविषयक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून …