Saturday, January 10 2026 | 03:11:34 AM
Breaking News

भारत संचार निगम लिमिटेडने देशभरातील सर्व विभागीय मंडळांमध्ये व्हॉइस ओव्हर वायफाय (व्हीओवायफाय) सेवांना केला आरंभ

Connect us on:

नवी दिल्‍ली, 1 जानेवारी 2026. नवीन वर्षारंभाच्या निमित्ताने, भारतातील आघाडीची सरकारी दूरसंचार कंपनी, भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) यांनी देशभरात व्हॉइस ओव्हर वायफाय (VoWiFi), ज्याला वाय-फाय कॉलिंग असेही म्हणतात, त्याचा आरंभ  करण्याची आनंददायी घोषणा केली आहे. ही प्रगत सेवा आता देशातील प्रत्येक दूरसंचार विभागीय मंडळातील सर्व बीएसएनएल ग्राहकांना उपलब्ध असेल, ज्यामुळे आव्हानात्मक वातावरणातही अखंड आणि उच्च-गुणवत्तेची कनेक्टिव्हिटी सुनिश्चित झाली आहे.

ही सेवा आता देशातील सर्व दूरसंचार विभागीय मंडळांमधील बीएसएनएल ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे. व्हॉइस ओव्हर वायफाय सेवा ग्राहकांना वाय-फाय नेटवर्कद्वारे व्हॉइस कॉल करण्यास, संदेश घेण्यास आणि प्राप्त करण्यास सक्षम करते, ज्यामुळे घरे, कार्यालये, तळघरे आणि दुर्गम ठिकाणे यासारख्या कमकुवत मोबाइल सिग्नल असलेल्या भागात सुस्पष्ट आणि विश्वासार्ह कनेक्टिव्हिटी सुनिश्चित होते.

व्हॉइस ओव्हर वायफाय ही एक आयएमएस-आधारित सेवा आहे जी वाय-फाय आणि मोबाइल नेटवर्क दरम्यान अखंड हस्तांतरणास समर्थन देते. या पध्दतीत तृतीय-पक्ष अनुप्रयोगांची आवश्यकता नसून ग्राहकांच्या विद्यमान मोबाइल नंबर आणि फोन डायलरचा वापर करून फोन केले जातात.

ज्या ठिकाणी बीएसएनएल भारत फायबर किंवा इतर ब्रॉडबँड सेवांसह स्थिर वाय-फाय कनेक्शन उपलब्ध असेल, तसेच जिथे मोबाइल कव्हरेज मर्यादित असू शकते, अशा ठिकाणी, विशेष करून  ग्रामीण आणि दुर्गम भागात ही सेवा लाभदायक ठरणार आहे.तसेच यामुळे व्हॉइस ओव्हर वायफाय  नेटवर्क गर्दी कमी करण्यास देखील मदत होते आणि वाय-फाय कॉलसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता विनामूल्य दिली जाईल.

बीएसएनएलच्या नेटवर्क आधुनिकीकरण कार्यक्रमात आणि देशभरात, विशेषतः वंचित भागात कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेमध्ये व्हॉइस ओव्हर वायफाय सुरुवात हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

बहुतेक आधुनिक स्मार्टफोन्सवर व्हॉइस ओव्हर वायफाय  अधिकृतपणे उपलब्ध आहे. ग्राहकांना फक्त त्यांच्या हँडसेट सेटिंग्जमध्ये वाय-फाय कॉलिंग सक्षम करावे लागेल. डिव्हाइस सुसंगतता आणि समर्थनासाठी, ग्राहक जवळच्या BSNL ग्राहक सेवा केंद्राला भेट देऊ शकतात किंवा बीएसएनएल हेल्पलाइन – 18001503 वर संपर्क साधू शकतात.

About Matribhumi Samachar

Check Also

ॲक्सिस बँकेने वाढत्या डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी ग्राहकांच्या नियंत्रणाखालील सुरक्षा सुविधांसह ‘सेफ्टी सेंटर’ सुरू केले

ग्राहकांना रिअल-टाइममध्ये पूर्णतः नियंत्रित करता येणाऱ्या सुरक्षा सुविधांद्वारे सक्षम करते एसएमएस शिल्ड : बँकेकडून येणाऱ्या …