Thursday, January 08 2026 | 03:20:35 PM
Breaking News

गोव्यातील आयसीएआर–सीसीएआरआयने विविध उपक्रमांनी साजरा केला स्वच्छता पंधरवडा

Connect us on:

गोवा, 1 जानेवारी 2026. भारतीय कृषि संशोधन परिषद (आयसीएआर) – केंद्रीय तटीय कृषि संशोधन केंद्र (सीसीएआरआय), गोवा यांच्या वतीने  दिनांक 16 ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान विविध उपक्रमांनी स्वच्छता पंधरवडा साजरा केला. या पंधरवड्याची सुरुवात 16 डिसेंबर रोजी संस्थेतील सर्व अधिकारी आणि कर्मचा-यानी स्वच्छता प्रतिज्ञा घेऊन केली. स्वच्छता व्यवस्थापन, पर्यावरणीय शाश्वतता आणि समाजजागृतीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

यावेळी स्वच्छता पंधरवड्यात कचऱ्यापासून पर्यावरणपूरक वस्तू बनवणे, संस्था परिसर व निवासी वसाहतींतील स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण, शेतकऱ्यांसोबत संवाद व स्वाक्षरी अभियान,  स्वच्छता रॅली, शाळा स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आणि विद्यार्थी व शेतकऱ्यांसाठी शैक्षणिक भेटी आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमांमध्ये गांडूळ खत, बायोगॅस निर्मिती, सांडपाणी पुनर्वापर (जलोपचार तंत्रज्ञान) आणि शेतीतील जैविक कचऱ्याचे वैज्ञानिक पुनर्चक्रण यावर विशेष भर देण्यात आला. या पंधरवडयात शेतकरी दिनाचे ही आयोजन करण्यात आले होते. गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर यांच्या हस्ते प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शेतकरी-केंद्रित योजनांवर बँक अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला.

स्वच्छता पंधरवडाचा समारोप उत्तर गोवा जिल्हा परिषदचे सदस्य श्री सिद्धेश श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. संस्थेतील गांडूळ खत, बायोगॅस युनिट, फॉस्फरस-समृद्ध सेंद्रिय खत (PROM) युनिट तसेच दुग्धशाळेतील पर्यावरणपूरक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यांची प्रत्यक्ष माहिती व प्रात्यक्षिके मान्यवरांना देण्यात आली. स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत प्रतिनिधींच्या शैक्षणिक भेटी संस्थेत आयोजित करण्याची तयारी संस्थेने दर्शवली. संस्थेच्या वतीने “मिशन स्वच्छता 365” या वर्षभर चालणाऱ्या उपक्रमाचेही वर्षभर आयोजन केले आहे.

संपूर्ण अभियानाचे समन्वय श्री विनोद उबरहंडे, नोडल अधिकारी आणि श्री राहुल कुलकर्णी, सह-नोडल अधिकारी यांनी केले.

About Matribhumi Samachar

Check Also

एडीएद्वारे आयोजित दोन दिवसीय ‘एअरोनॉटिक्स 2047’राष्ट्रीय चर्चासत्राला बंगळुरुमध्ये प्रारंभ

एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए) द्वारे आयोजित ‘एअरोनॉटिक्स 2047’या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला  बंगळुरूच्या सेंटर फॉर एअरबोर्न …